व्हेजिटेबल रायता (Vegetable raita recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही होणे हा प्रकार आलाच... बाहेरून जितका उकाडा आपल्याला जाणवत असतो, तितकीच उष्णता शरीराला आतून देखील जाणवत असते. अशा वेळी ही उष्णता कमी करण्यासाठी शरीरात खूप पाणी आणि शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ, भाज्या, फळे जाणे गरजेचे असते. अशा वेळी सर्वात उत्तम अशी गोष्ट म्हणजे 'कोशिंबीर' (Salad). यामुळे शरीरात पाणीही भरपूर प्रमाणात जाते, शरीरातील हिटही कमी होते आणि सर्वात महत्त्वाचे अनेक पोषकतत्वे मिळतात.
दही रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज करिता मी शिल्पा वाणी माईंची रेसिपी कुकस्नॅप केली खूपच छान झाली आहे रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपदही
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1बीट बारीक चिरलेला
  4. 1गाजर बारीक चिरलेला
  5. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली
  7. 1/2काकडी बारीक चिरलेली
  8. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  9. 1हिरवी मिरची चिरलेली
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. मीठ चवी नुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    एका मिक्सिंग बाऊलमधे दही (फेटलेले) घेऊन त्यात काकडी, कांदा, टोमॅटो,गाजर, मिरची, बिट, कोथिंबीर, चाट मसाला आणि मीठ घालून छान एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    फोडणी पात्रात तेल घालून त्यात जीरे मोहरी तडतडू द्यावी, मग ही फोडणी तयार रायत्यावर वर घालावी.

  3. 3

    थंडगार व्हेजिटेबल रायता थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेऊन नंतर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes