गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)

गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.
गावरान उकड भरलेली वांगी (Gavran Ukad Bharleli Vangi Recipe In Marathi)
गावरान उकड भरलेली वांगी भाकरी किंवा भाताबरोबर खूप चविष्ट लागतात.
ही वेगळ्या पद्धतीने उकड काढून भरलेली वांगी, एकदा नक्की करून पाहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्या. व त्याला चिरा पाडा.
- 2
आता ही वांगी मिठाच्या पाण्यात थोड्या वेळा करता तशीच ठेवा.
- 3
पॅनमधे बेसन कोरडेच भाजून घ्या.
- 4
आता एका प्लेटमधे भाजलेले बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ, कांदा, शेंगदाणे कूट, सुके खोबरे किस, कोथिंबीर आणि थोडे तेल घाला.
- 5
आता हे मिश्रण हातानेच छान एकत्र करा.
- 6
तयार मिश्रण वांग्यामधे छान भरून घ्या.
- 7
आता ही स्टीम (वाफवून) घ्या.
- 8
पॅनमधे थोडे तेल गरम करून त्यात धणे, जीरे आणि खसखस छान परतून घ्या.
- 9
नंतर त्यात उभा चिरलेला कांदा, आलं, लसूण, सुके खोबरे किस, तिळकूट, कोथिंबीर घालून छान परतून घ्या.
- 10
आता हे साहित्य छान बारीक वाटून घ्या.
- 11
कढईत तेल गरम करून त्यात कडिपत्ता आणि तयार वाटण घालून छान परतून घ्या.
- 12
नंतर त्यात हिंग,लाल तिखट,हळद, मीठ घाला.
- 13
थोडे पाणी घालून छान एकत्र करून घ्या.
- 14
आता त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.
- 15
उकड काढलेली वांगी घालून छान वाफ काढा.
- 16
वरून कोथिंबीर घाला.
- 17
गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
भरली वांगी (नाशिक कडची पद्धत) (Bharli vangi recipe in marathi)
गोदावरी काठची काटेरी वांगी भरून केले की अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात Charusheela Prabhu -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल रेसिपीथंडीमध्ये गरमागरम आणि चमचमीत खाण्याची इच्छाही सगळ्यांनाच होते. हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या भाज्या मिळतात .भरलेली मसाला वांगी चपाती,भाकरी, किंवा भातासोबत खूप सुंदर लागतात. Poonam Pandav -
चमचमीत भरलेली वांगी
पिढ्यानं पिढ्या चालत आलेली नाव एकूणच तोंडाला पाणी सुटणारी अशी ही भरलेली वांगी Jyoti Kinkar -
विदर्भ पद्धतीने भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3सोप्या पद्धतीने विदर्भातली झणझणीत भरली वांगी बिटया बरोबर खातात पण मी भाकरी केलीय मस्त टेस्टी Charusheela Prabhu -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#EB2#wk2#winterspecialrecipes#E-Book challengeवांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून ...😊या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
गावरान वांग्याची तिळ घालून भाजी (Gavran Vangyachi Til Mix Bhaji Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी Sampada Shrungarpure -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
-
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#NVRमहाराष्ट्रीयन थाळीमध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांच्या समावेशाशिवाय त्या थाळीला रंगतच येत नाही. कुठल्याही महाराष्ट्रीयन फेस्टिवल च्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये स्पेशल असलेली अशी ही पाककृती म्हणजे भरली वांगी. इथे मी हिरव्या रंगाची वांगी म्हणजे काही लोक त्या वांग्याला गुळ वांगी असे म्हणतात, ती वापरलेली आहेत जी अतिशय पटकन म्हणजे एका बाफेत शिजून येतात, त्यामुळे ती सोयीस्कर ठरतात आणि अतिशय रुचकर अशी ही मालवणी पद्धतीची भरली वांगी आज आपण पाहूया. Anushri Pai -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनेहमीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने व मसाले वापरून बनविले की त्या भाज्या चवीने खाल्ल्या जातात. त्यापैकीच "वांगी". झणझणीत वांग्याची रस्सा भाजी, सूखी वांग्याची भाजी, डाळ वांगे, भरलेली वांगी अश्या वेगवेगळ्या प्रकारे वांगी बनविली जातात. त्यापैकी "भरली वांगी" ही रेसिपी मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
भरलेली वांगी (bharali wangi recipe in marathi)
#स्टफ्ड #week1वांग्याची भाजी खूप प्रकारे करता येते. वांग्याचे भरीत, वांग्याचे काप, वांग्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार करता येतात. भरलेली वांगी पण वेगवेगळे मसाले घालून करतात. आज मी गोडा मसाला घालून भरलेली वांगी बनवली. खूप छान लागते ही भाजी. स्मिता जाधव -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
"गोड्या वाटणातली भरली 'सफेेेद' वांगी" (bharli safed vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#सोमवार_भरली वांगी सफेद वांगी चवीला खूप मस्त असतात, आमच्या वसई-विरार तसेच कोकणात सिझन ला ही वांगी खुप मिळतात... आणि यांची चव तर अहाहा... तेव्हा नक्की करून बघा, माझी ही मस्त रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 झुणका म्हटलं तर गाव ची आठवण येतेच नक्की. गरम गरम भाकरी आणि आईं किंवा आजी च्या हातचा झुणका. अफलातून!!!!आज आपण ही प्रयत्न करू या गावरान झुणका बनवायची. SHAILAJA BANERJEE -
खानदेश स्पेशल भरलेली मसाला वांगी/ मोदक भरलेली वांगी (modak bharleli vangi recipe in marathi)
#KS4# मस्त चटपटीत झणझणीत आणि आज बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागते भाजी आपल्याकडे नसेल आणि काहीतरी चट्टा केदार जेवण जेवायच असेल तर.... ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
-
गावरान पद्धतीने ज्वारी ची तिळ लावून भाकरी (Gavran Jwari Chi Til Laun Bhakri Recipe In Marathi)
#GR2गावरान रेसीपी#ज्वारी#भाकरी Sampada Shrungarpure -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
झणझणीत गावरान अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
अंडा ग्रेव्ही मधील, हा गावरान अंडा मसाला माझा खूप आवडता...😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चवीष्ट भरली वांगी (Bharli Vangi recipe in marathi)
वांग्यात भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॉमिन बी ६ आणि फ्लेवोनॉइड्स असतात. त्यामुळे हृद्यविकारांचा धोका कमी होतो. याशिवाय यातील अँटीऑक्सीडेंट्स नसा स्वस्थ ठेवतात आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतात.मी जी भरली वांगी केली आहेत ती फारच चविष्ट लागतात आणि करायलाही सोपी आहे रेसिपी.नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
विदर्भ स्टाईल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3भरली वांगी ही विशेष पॉप्युलर अशी रेसिपी आहे...बट ही बनवण्याच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या आहेत...झणझणीत कोल्हापुरी भरली वांगी आणि त्याच पद्धतीने विदर्भातील थोडी गोड अशी भरली वांगी अशा प्रांत तशा पद्धती आहेत प्रत्येकाची स्टाईल वेगळी त्याचप्रमाणे मी जरा कमी साहित्यात होईल अशी विदर्भ स्टाईल भरली वांगी केली आहेत...तर पाहुयात रेसिपी..😊 Megha Jamadade -
भरली वांगी(पुणेरी) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळा आणि वांगी यांचं अतूट नातं आहे.तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर वांगी मिळतात.पण थंडीत वांग्याची भाजी म्हणजे मेजवानीच असते!वांगी प्रकृतीने उष्ण ,त्यामुळे थंडीत उर्जा वाढवण्यासाठी वांगी भाजी,भरीत या स्वरूपात सेवन केली जातात.गरम बाजरीची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी म्हणजे स्वर्गसुखच!...मग बाकी काही नसले तरी चालते.खरंतर चुलीवरचा या भाजी भाकरीचा स्वयंपाक अगदी खुमासदार असतो,पण आपल्या शहरात हे सुख कुठले?...मग विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट्स इथे आवर्जून मिळतं हे खास गावरान चवीचं भोजन.कृष्णाकाठची वांगी अगदी जांभळी,काटेरी,पातळ सालीची.जळगावकडची खास भरितासाठी.प्रत्येक प्रांताची चव निराळी!काळी,लांब बंगाली वांगी मिळमिळीत चवीची...ती आपल्याकडे फारशी नाही खाल्ली जात.सांबारातही दक्षिणेकडे वांग्याचा वापर केला जातो.वांग्याचे काप म्हणजे खमंग साईड डीश...तर डाळवांगे म्हणजे मस्त आंबटगोड आमटी आणि त्याबरोबर आंबेमोहोर तांदळाचा भात....याची चव न्यारीच.वांगीबटाटा रस्सा अगदी वेळ भागवणारी भाजी,तर संक्रांतीच्या लेकुरवाळ्या भाजीत वांगी अग्रस्थानी. भरिताचेही अनेक प्रकार!वांगी व बटाटा उकडून त्याचं भरित करणं म्हणजे माझ्या आजीचा अगदी आवडता प्रकार!चातुर्मासात वातकारक म्हणून वर्ज्य असलेली वांगी चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवून मग खायला सुरुवात होत असे.म्हणजे ही वांगी आषाढ ते कार्तिक पावसाळा वातदोष वाढवणारी म्हणून निषिद्ध तर मार्गशीर्षापासून थंडी पडायला लागत असल्याने पुन्हा आहारात समावेश!आपल्या पूर्वजांना आहाराचे किती ज्ञान होते ते यावरुन कळते.चला तर भाजीच्या तयारीकडे वळू!ही भाजी पुणेरी यासाठी की यात मी फक्त गोडा मसाला वापरला आहे,तरीही सुंदर चव आली आहे.😋😋🍆🍆 Sushama Y. Kulkarni -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#W2ही माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे# भरली वांगी विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीचमचमीत भरली वांगी Minal Gole -
भरलेली कारली (bharleli karle recipe in marathi)
#fdr#भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्यामैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
घाटी वांगी मसाला (Ghati vangi masala recipe in marathi)
घाटावरची काटेरी वांगी.. भरून मसाला केला की भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
झणझणीत गावरान खारं वांग (khara vanga recipe in marathi)
#EB2#Week2 "झणझणीत गावरान खारं वांग" खारं वांग झटपट होणारी व मस्त चविष्ट होणारी रेसिपी आहे व ही प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त.. दोन दिवस टिकते.. आमच्या घरात खुप आवडीने खातात.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या (4)