खमंग खुसखुशीत स्वादिष्ट शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli reicpe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week11

#पुरणपोळी
शेंगदाणे आणि गुळाचं सारण घालून बनवलेल्या ह्या पोळ्या म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा ह्या पोळ्या बनवायला अगदी सोप्या आहेत. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून ह्या पोळ्या अगदी झटपट करता येतात.

खमंग खुसखुशीत स्वादिष्ट शेंगदाण्याची पोळी (shengdanyachi poli reicpe in marathi)

#रेसिपीबुक #week11

#पुरणपोळी
शेंगदाणे आणि गुळाचं सारण घालून बनवलेल्या ह्या पोळ्या म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा ह्या पोळ्या बनवायला अगदी सोप्या आहेत. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून ह्या पोळ्या अगदी झटपट करता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभाजलेले शेंगदाणे
  2. 1 कपचिरलेला गूळ
  3. 1/2 चिमूटमीठ
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  5. 2 चिमूटमीठ
  6. 1 कपकणिक
  7. 1/2 टीस्पूनतेल
  8. तांदुळाचं पीठ पोळ्या करताना लावायला

कुकिंग सूचना

60 मि
  1. 1

    बाहेरील आवरणासाठी कणिक, तेल, २ चिमूट मीठ घालून पीठ भिजवून घ्या. फार सैल नको आणि फार घट्ट ही नको.

  2. 2

    सारण बनवण्यासाठी -
    भाजलेले शेंगदाणे आणि गूळ मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घ्या. शेंगदाण्याची सालं नाही काढली तरी चालतात. जरा ओलसर मिश्रण होईल. मिश्रण ताटलीत काढून घ्या. 

  3. 3

    मिश्रणात अर्धी चिमूट मीठ (ऐच्छिक), वेलची पूड घालून मिक्स करा. सारणाचा गोळा तयार होईल. ह्या पोळीच्या सारणात मी किंचित मीठ घालते. तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका.

  4. 4

    पिठाचे २ छोटे गोळे घेऊन २ पुऱ्या लाटून घ्या.

  5. 5

    पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट सारणाचा गोळा घेऊन तो एका पुरीवर पसरावा. त्यावर दुसरी पुरी ठेवा आणि कडा बंद करा.

  6. 6

    हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.

  7. 7

    कडा सुरीने / कातण्याने कापून काढून टाका.

  8. 8

    पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या.

  9. 9

    खमंग खुसखुशीत शेंगदाण्याची पोळी साजूक तुपाबरोबर खायला द्या.

  10. 10

    शेंगदाण्याच्या पोळ्या फ्रिजमध्ये ठेवू नका. ४-५ दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes