बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही.

बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

बाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. 1/2 टीस्पूनओवा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनतीळ
  6. 1/2 कपकिसलेलं सुकं खोबरं
  7. 1 टीस्पूनधने
  8. 1 टेबलस्पूनपिठीसाखर
  9. 1/4 टीस्पूनखसखस
  10. 1/4 कपशेव
  11. 3-4 टीस्पूनचिंचगुळाची चटणी
  12. 1/2 टीस्पूनबडीशेप
  13. चवीनुसार मीठ
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनलाल तिखट
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

60 मिनिटे
  1. 1

    मैद्यात, बेसन, ओवा आणि अर्धा टीस्पून मीठ घालून एकजीव करा. २ टेबलस्पून कडकडीत तेल ह्या मिश्रणात घाला. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या. १५ मिनिटं झाकून ठेवा.

  2. 2

    सारणासाठी धने, तीळ, खसखस, बडीशेप २ मिनिटं भाजून घ्या.

  3. 3

    खोबऱ्याचा कीस गुलाबी रंगावर भाजून घ्या.

  4. 4

    मिक्सरमध्ये भाजलेले मसाले, खोबरं, लाल तिखट, गरम मसाला, पिठीसाखर आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या.  हे सारण तयार झालं.

  5. 5

    आता मैद्याचं पीठ जरा मळून ४ गोळे करून घ्या.

  6. 6

    प्रत्येक गोळ्याची पोळी लाटा. दोन बाजूच्या कडा कापून घ्या.

  7. 7

    पोळीवर १ टीस्पून चिंचगुळाची चटणी पसरून घ्या.

  8. 8

    त्यावर १ टीस्पून सारण पसरून घ्या.

  9. 9

    थोडी शेव बारीक करून घाला. आणि हलक्या हाताने लाटणं फिरवून घ्या म्हणजे सारण पोळीला चिकटेल.

  10. 10

    शेवटच्या कडेला थोडं पाणी लावून घ्या.  पोळीची घट्ट गुंडाळी करून अर्धा इंच रुंदीचे तुकडे करा. प्रत्येक तुकडा सारण दिसेल ती बाजू वर ठेवून हलकेच दाबून घ्या.

  11. 11

    कढईत तेल गरम करून हे तुकडे मंद आचेवर खरपूस तळून घ्या.

  12. 12

    खमंग, खुसखुशीत बाकरवडी तयार आहे. गार झाल्यावर आस्वाद घ्या.बाकरवडी हवाबंद डब्यात २-३ आठवडे छान राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes