मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4 #week2
#cooksnap
आजच ही अफलातुन कॉफी #सात्विकभोजन कडून पोस्ट केलेली बघितली, थोडा वेळ विश्वासच बसला नाही . खात्री करण्यासाठी प्रयत्न करून पाहीला , थोडासा बदल केला आणि अविश्वसनीय .. एकदम जबरदस्त चवीची कॉफी झाली. गोल्डन अॅप्रन च्या प्रश्नमंजुषेतील फेन्युग्रीक म्हणजेच मेथीदाणेपासुन ही कॉफी मधुमेहींसाठी वरदान वाटते ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
1 सर्विंग
  1. 2 कपदूध
  2. 2 टीस्पूनमेथीदाणे
  3. 4 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मेथीदाणे खमंग भाजून घ्यावेत व छोट्या खलबत्यात भरड पुड करुन घ्यावी.

  2. 2

    आता दुध गरम करायला ठेवावे. व दुसरीकडे पॅनमध्ये साखर घेऊन कॅरॅमल करण्यासाठी परतावी.

  3. 3

    साखरेचे कॅरॅमल झाल्यावर त्याच पॅनमध्ये तापवलेले दूध घालून एकसारखे ढवळावे.दुधाला उकळी येत असताना मेथीची भरड पूड घालून एक दोन उकळ्या येऊ द्याव्यात. व त्यानंतर गॅस बंद करावा.

  4. 4

    पॅन मधील दूध भांड्यात घेऊन रवीने घुसळावे म्हणजे कॉफीचा फेस व फिल दिसेल गर्मागरम कॉफी सर्व्ह करावी. नेस्कॅफे सारखी हुबेहूब लागणारी ही कॉफी कोणालाही कळणार नाही की ही मेथी दाण्यांची कॉफी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes