डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#दूध
कॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२ माणसे
  1. 4 चमचेकॉफी पावडर
  2. 4 चमचेसाखर किंंवा ३ चमचे पिठीसाखर
  3. 4 चमचेगरम पाणी
  4. 1 1/2 कपथंड दूध
  5. बर्फाचे तुकडे (आवश्यक असल्यास)
  6. चॉकलेट चिप्स

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एक वाडगा घ्या जो पुरेसा खोल आहे. त्यात कॉफी पावडर, साखर, गरम पाणी घाला आणि नीट ढवळून घ्या.

  2. 2

    तुमच्याकडे इलेक्ट्रिक व्हिस्कर असल्यास त्याचाही वापर करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि उर्जा हि वाचेल. ते नसल्यास, जवळजवळ १० मिनिटांसाठी सतत हाताने ढवळत राहा जोपर्यंत फेसाळ आणि जाड पोत मिळत नाही.

  3. 3

    व्हीप्ड कॉफीचा रंग छान हलका तपकिरी रंगात बदलेल. त्यानंतर एक ग्लास घ्या आणि त्यात ३/४ थंडगार दूध घाला. पेयांची शीतलता टिकविण्यासाठी बर्फाचे तुकडे पर्यायी आहेत.

  4. 4

    ग्लासमध्ये व्हीप्ड कॉफी ओतून पूर्णपणे भरा. तर अशा पद्धतीने तुमची डालगोना कॉफी सर्व करण्यास तयार झाली. पिण्यापूर्वी तुम्ही कॉफी नीट ढवळून घ्या. आवडत असल्यास वरती चॉकलेट चिप्स टाकून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes