लिंबूची पाने टाकून ओल्या बोंबीलाचे कालवण / ग्रेव्ही (limbu pane bombil gravy recipe in marathi)

Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333

#GA4
#week4

फिश करी कोणाला नाही आवडत... अगदी लहानांपासून मोठ्यांन पर्यन्त... लग्न करून चूरी कुटुंबात आले तेव्हा बोंबील कालवण मध्ये लिंबूची पाने टाकताना मी पहिल्यांदा पाहिले. माझ्या सासूबाई नेहमी बोलायच्या अगं खाऊन तर बग... खातच राहशिल. पण हे मात्र खरे निघाले... काय अफलातून लागते.. लिंबाच्या पानांचा वास आणि वाफाळत्या भाताबरोबर तर खूपच भारी लागते.... पालघर जिल्हात चिंचणी, तारापूर या गावात ओल्या बोंबील कालवण ची ही पद्धत आहे हे लग्नानंतर समजले. सासू नेहमी बोलायची ही आपल्या नानांची रेसिपी.. नाना म्हणजे माझे आज्जेसासरे. आज त्यांची रेसिपी तुमच्या समोर मांडत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3-4 जणांसाठी
  1. 8-9ताजे ओले बोंबील
  2. 50 ग्रॅमटोमॅटो पेस्ट
  3. 10 ग्रॅमआले लसुण मिरची कोथिंबीर पेस्ट
  4. 100 मिलीचिंचेचा कोळ
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 4-5लिंबूची हिरवी गार पाने
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    बोंबील साफ करून त्याचे लहान तुकडे करून त्याला थोडे लाल तिखट व हळद चोळून घ्या.

  2. 2

    कढई मध्ये तेल गरम करून त्यात आले लसुण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यास त्यामध्ये लाल तिखट, हळद व लिंबूची पाने चुरबुडून त्या मध्ये टाका मिश्रणात तेल सुटे पर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्या मध्ये चिंचेचा कोळ व चवीनुसार मीठ घालून एक उकळी घ्या.

  3. 3

    एक उकळी आल्यावर अलगद त्या मध्ये बोंबील सोडून आणखीन एक उकळी घ्या. ऐवाना लिंबाच्या पानाचा छान सुगंध सुटलेला असेल. गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर ही ग्रेव्ही खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti B. Raut
Trupti B. Raut @cook_23876333
रोजी

Similar Recipes