उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)

#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ खायला छान वाटतात.म्हणून आज उपवासाचे डोसे करत आहे. अगदी कमी सामग्री मध्ये कमी वेळात होणारा हा डोसा आहे.
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ खायला छान वाटतात.म्हणून आज उपवासाचे डोसे करत आहे. अगदी कमी सामग्री मध्ये कमी वेळात होणारा हा डोसा आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम साबुदाणा आणि भगर वाटी मध्ये काढून घ्यावी
- 2
साबुदाणा मिक्सर मध्ये रवाळ वाटून घ्यावा.भगार सुद्धा वाटून घ्यावी.साबुदाणा आणि भगर एकत्र वाटून घ्यावी.त्यामध्ये मिरची,जीरे, मिर पावडर,जीरे पावडर एक उकडलेला बटाटा,दही टाकून एकजीव वाटून घ्यावे
- 3
मिश्रण छान एकजीव वाटून घ्यावे.त्यामध्ये वेळेवर मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा टाकावा.
- 4
आता नॉन स्टीक तवा गॅस वर ठेवावा. तवा हाय फ्लेम वर गरम करावा. आणि चोहो बाजूने तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर गोल पळीने डोसा टाकावा.डोस्याला छान जाळी येते. एक झाकण झाकून ठेवावे. त्यानंतर झाकण काढून तेल टाकावे. डोसा मध्यम ते कमी आचेवर शिजवावे. दोन्ही बाजूने लालसर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा.
- 5
डोसा झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावा. शेंगदाण्याची आणि दह्याची चटणी करून घ्यावी.
- 6
अश्या प्रकारे सर्व डोसे करून घ्यावे. कमी वेळात कुरकुरीत आणि जाळीदार डोसे तयार होतात चटणी आणि बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला घेतले.... त्यातीलच एक, भगर चा ढोकळा! करायला एकदम सोपा ,कमी सामग्री लागणारा, आणि छान होणारा.... शिवाय पटकन तयार होणारा.... तेव्हा बघूया उपवासाच्या भगरीच्या ढोकळ्याची रेसिपी... Varsha Ingole Bele -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसाकी वर्ड ओळखून रवा डोसा करत आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ. डोसा हा दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करता येतात. त्यात आणखी नवीन प्रकार म्हणजे रवा डोसा.रवा डोसा अतिशय कुरकुरीत लागतो. बटाट्याची भाजी, सांभार आणि डाळीची चटणी बरोबर खुप छान लागतो. मी दलियाची चटणी सोबत केली आहे. rucha dachewar -
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar -
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपी#एकादशी स्पेशल उपवासाचे रेसिपीप्रत्येक वेळी खिचडी वरीचा भात खाऊन कंटाळा येतो म्हणून वरी आणि साबुदाणा मिळून उपवासाचे डोसे केले आहेत Smita Kiran Patil -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ#नवरात्र मी पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान झालेला. Sujata Gengaje -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
उपवासाचे पदार्थ खूप पचण्यासाठी जड असल्याने साबुदाणा न खाता केलेले ही रेसिपी वाफवून केलेली आहे. Vaishnavi Dodke -
उपवासाचा मसाला डोसा (upwasacha masala dosa recipe in marathi)
#fr#भगरउपवासाच्या पदार्थांमधील माझा सर्वात आवडता पदार्थ .उपवास नसतानाही,आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.उपवासाची बटाटा भाजी ,ओल्या नारळाची चटणी आणि सोबत भगर साबूदाण्याचा कुरकुरीत डोसा एक भन्नाट काॅम्बिनेशन!!!😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
#cooksnap # वैष्णवी दोडके # मी आज तुमची ही रेसिपी केली आहे. छान झाला आहे ढोकळा. मी त्याला वरून तडका दिलेला आहे... Varsha Ingole Bele -
उपवासाचा भगरीचा डोसा (upwasacha bhagar dosa recipe in marathi)
#GA4#week3# DosaGA4 मधील की वर्ड मध्ये असलेल्या शब्द डोसा म्हणून मग मी आज उपवासाचा भगरीचा दोसा केलाय. उपवासाचा दोसा करताना तुम्ही भगर व साबुदाणा याचे पीठ मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता, किंवा भगर साबुदाणा भिजवून ते मिक्सरला लावून पेस्ट करून हि करू शकता.. मी येथे भगर एक ते दीड तास भिजत घातली आणि मग त्यात साबुदाणा पीठ मिक्स करून दोसा तयार केला आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ असल्याने मी अशा प्रकारे केले. पण यापैकी कुठल्याही प्रकार जो तूम्हाला सोयीस्कर वाटेल, तुम्ही त्या पध्दतीने हा दोसा करू शकता. अतिशय सुंदर, कुरकुरीत असा हा झटपट होणारा दोसा नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
इन्स्टंट मल्टी ग्रेन स्पाईसी डोसा (instant multigrain spicy dosa recipe in marathi)
अगदी पटकन होणारा व चवीला पण छान होणारा असा पौष्टिक डोसा. Nilan Raje -
इन्स्टंट कर्ड डोसा (instant curd dosa recipe in marathi)
#goldenapron3 19th week curd ह्या की वर्ड साठी झटपट होणारा कर्ड डोसा बनवला आहे.अगदी कमी साहित्य आणि कमी वेळात होणार डोसा. Preeti V. Salvi -
इंस्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
#cooksnap रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. आज सकाळी असाच विचार करताना आपल्या ग्रुप मधल्या प्रगती हकीम यांच्या इंस्टंट रवा डोसा ची रेसिपी पाहिली आणि ठरवलं आज हाच नाश्ता करायचा. त्यांच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून मी आज डोसे केले आणि खरच खुपच छान झाले. कमी वेळात पटकन होणारे आणि पौष्टिक अशी ही रेसिपी. थँक्यू प्रगती ताईPradnya Purandare
-
झटपट रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 अगदी कमी वेळात तयार होणारा आधीपासून काही तयारी नसली तरीही करता येणारा हा पदार्थ तुम्हा सगळ्यांना आवडेल R.s. Ashwini -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 # रवा डोसा....झटपट होणारा.. मुळचा दाक्षिणात्य पदार्थ! परंतु आता सर्वदूर आवडीने खाल्ला जाणारा ...आणि मग त्यातच वेगवेगळे प्रकार! त्यातलाच हा, झटपट होणारा रवा डोसा... दोस्यासोबत सहसा बटाट्याची भाजी आणि सांबार असतोच ...शिवाय चटणी ही... पण मला घाई असल्यामुळे मी फक्त खोबऱ्याची चटणी केली... त्यासोबत आणि क, तयार असलेली पुदिन्याची हिरवी चटणी, सर्व्ह केली... पण छान झाला चटणी आणि दोसा खाण्यासाठी.... Varsha Ingole Bele -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25 रवा डोसा हा कीवर्ड ओळखून मी हे डोसे आज केले. Prachi Phadke Puranik -
उपवासाचा क्रिस्पी साबुदाणा डोसा (sabudana dosa recipe in marathi)
#nrrउपासासाठी एक मस्त क्रिस्पी डोस्याची रेसिपी....,,,खूप छान कुरकुरीत होतो हा डोसा आणि गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे.,,,,तर करुन पहा तुम्ही पण Supriya Thengadi -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
उपवासाचा पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)
#पॅनकेकआज उपवास असल्याने , कालच विचार केला साबुदाण्याची उसळ करण्याचा आणि रात्री साबुदाणा भिजत घातला. झोपेच्या आधी मोबाईल चेक केल्यावर लक्षात आले, की पॅनकेक रेसिपी पोस्ट करायचा शेवटचा दिवस आलाय. पण उपवास असल्याने काही आता पुन्हा पॅनकेक होणार नाही.सकाळी उठल्यावर साबुदाणा पाहिल्यावर असे वाटले की याचाच पॅनकेक बनवून पाहू. मग लगेच भगर भिजत घातले. आणि उपवासाला चालणारे जिन्नसातूनच पॅनकेक बनविले. Varsha Ingole Bele -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा डोसा (मिनी) (rava dosa recipe in marathi)
#GR #week25#Ravadosaझटपट रवा डोसा ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय आहे. यात आपण भाज्या किसून घालून हेल्दी बनवू शकतो आज मी अगदी झटपट होणारा साधा रवा डोसा बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
उपवासाचे बास्केट (upwasache biscuit recipe in marathi)
#उपवासाचे रेसिपी आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने सर्व जण उपवास करतात व या उपवासाला उपवास फक्त म्हणायचे कारण प्रत्यक्षात खूप उपवासाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जातात म्हणूनच प्रचलित म्हण आहे की एकादशी दुप्पट खाशी 😊 म्हणूनच मी देखील सकाळपासून खूप पदार्थ बनवले पण उपवासाचे बास्केट हे आज पहिल्यांदाच बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
वरई तांदूळ पोटैटो स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित पॅनकेक (upwasacha pancake recipe in marathi)
#पॅनकेकपॅनकेक जगभरातील बर्याच संस्कृती मध्ये प्रसिद्ध डिश आहे, जी एक प्रकारची सपाट ब्रेड किंवा साधा केक आहे, जो गोड किंवा तिखट असतो . आपण भारतात डोसा, आणि महाराष्ट्रात धिरडे म्हणू शकतो.पॅनकेक रेसिपीत पिठ, अंडी आणि दूध हे मूलभूत खाद्य पदार्थ असतात. अमेरिका आणि कॅनडासारख्या काही देशांमध्ये, पॅनकेक्स न्याहारी म्हणून दिले जातात, युरोपमध्ये इतर काही देशांमध्ये पॅनकेक्स रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून खातात, (आकारानुसार, थोडेसे अधिक किंवा कमी) तयार करू शकता. आपण अतिथींच्या संख्येनुसार अन्नपदार्थांचे प्रमाण घेतात.उपवासाचा पॅनकेक बनविण्यासाठी भगर, साबुदाणा, राजगिरा पीठाचे बैटर बनवावे लागते. हा पॅनकेक सोपा आणि इन्स्टंट होणारा आहे ह्यात भगर, साबुदाणा रात्री भिजवावा लागत नाही. हा पॅनकेक चवीमध्ये थोडा वेगळा आहे. स्वादिष्ट आहे. आहे आपण पॅनकेक मधे बटाट्याची चटनी स्टफ्ड करणार आहोत.तर चला तर आज करूयात इन्स्टंट वरई तांदूळ (भगर ) पोटैटो स्टफ्ड उपवासाचा कुरकुरित, स्वादिष्ट पॅनकेक. Swati Pote -
उपवासाची भगर (upwasachi bhagar recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची भगर करत आहे. पचायला खूप हलकी असते rucha dachewar -
इन्स्टंट रवा डोसा (instant rava dosa recipe in marathi)
इन्स्टंट रवा डोसा#GA4#week7या विकच्या चँलेंज़ मधून breakfast हा क्लू ओळखून आज़ मी इन्स्टंट रवा डोसा केला . डोसे फारच लुसलुशीत अणि छान झाले. Nanda Shelke Bodekar -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 #dosaडोसे हे खूप प्रकारचे बनवता येतात. वेगवेगळ्या डाळी आणि वेगवेगळी पीठं तसेच आपल्या आवडीनुसार भाज्या वापरुन सुद्धा कुरकुरीत आणि साॅफ्ट डोसे बनवतात. आमच्या कडे कोणत्याही प्रकारचे डोसे खूप आवडतात. रस्सा भाजी केली असेल किंवा मटण रस्सा, चिकन रस्सा असेल तर त्याबरोबर डोसे खायला खूपच मस्त लागतात. मी आज अगदी झटपट होणारे एकदम सुपर साॅफ्ट आणि छान जाळीदार डोसे बनवले. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
"कुरकुरीत रवा डोसा' (rava dosa recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Ravadosa "कुरकुरीत रवा डोसा" रवा डोसा बनवताना मला जरा अडखळायलाच व्हायचे..माझा डोसा तवा मोठा असल्यामुळे आणि बॅटर पातळ करून डोसा तव्यावर घालताना गोल होत नसे... लांब पर्यंत बॅटर पसरले जायचे.किंवा जाडसर व्हायचे,नरम पडायचे..पण मी माझी मैत्रिण,सखी दिप्ती पडियार ची रेसिपी कुकस्नॅप केली.. तिने रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून बॅटर घट्टसर होण्यासाठी गव्हाचे पीठ घातले आहे तिथे मी मैदा घालून बॅटर बनवले आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे मस्त डोसे झाले आहेत..गोल गरगरीत, कुरकुरीत मस्त झाले आहेत आणि कलरही छान आला आहे...थॅंक्यु दिप्स खुप छान झाले आहेत डोसे.. लता धानापुने -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week7 ,,:-Dosa#ब्रेकफास्ट (breakfast) ह्या कीवर्ड वरून रेसिपी केली आहे.पचायला हलका आणि चवीला रुचकर लागणारा डोसा आज केलेला आहे. अतिशय कमी तेला मध्ये होणारा हा पदार्थ आहे. दक्षिणेकडील लोकप्रिय पदार्थ आहे.शिल्लक इडलीचा बॅटरमध्ये जाड पोहे आणि रवा टाकून खमंग कुरकुरीत डोसा केला आहे. rucha dachewar -
साबुदाण्याची खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#साबुदाण्याची खिचडी :आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे त्यानिमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आतापर्यंत बऱ्याच रेसिपी प्रकाशित केलेल्या आहेत.उपवासाच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा असते. लहानपणी साबुदाण्याची खिचडी खायला आवडते म्हणून उपवास करीत होती. आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा योग आलेला आहे. rucha dachewar -
पौष्टिक नी झटपट हिरव्या मुगाचा डोसा(Moongacha Dosa recipe in Marathi)
#Dosa#healthyवजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते.मूग डोसे हा झटपट होणारा प्रकार आहे आणि पौष्टिक सुद्धा....चला तर मग आज पाहूया कसा करतात हा मूग डोसा... Prajakta Vidhate -
कलिंगडाच्या सालीचा डोसा (Watermelon Peel Dosa Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज.कलिंगड थोडेसे शिल्लक होते.म्हणून सालीचे डोसे करून बघितले.खूप छान झाले.कमी साहित्यात झटपट होणारा पौष्टिक डोसा. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या