उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap_Challenge..

#उकडीचे_मोदक_Cooksnap_Challenge
गोरा गोरा पान छोटा छोटा छान.. हे बडबड गीत आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी ऐकले आहे आणि आणि खूप वेळा म्हटले देखील आहे..आज पुन्हा एकदा लहान होऊन हे गीत म्हणू या..😊
गोरा गोरा पान छोटा छोटा छान
गोरा गोरा पान छोटा छोटा छान
सुपाएवढे कान त्याचे दिसतो किती छान
सुपाएवढे कान याचे दिसतो किती छान
इवले इवले डोळे काळे काळे निळे
इवले इवले डोळे काळे काळे निळे
सोंड कशी छातीवर वाकुडी वळे
मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट
मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट
उंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे
उंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे
मोठे मोठे दात चार याचे हात
मोठे मोठे दात चार याचे हात
एकवीस मोदकांचा एकच घास
एकवीस मोदकांचा एकच घास..
एकवीस मोदक एकाच घासात खाणार्या माझ्या बाप्पासाठी मी @cook_19609542 सुधाताईं नी त्यांच्या live मध्ये दाखवलेली उकडीचे मोदक ही रेसिपी cooksnap केली आहे.. सुधा ताई तुमच्या सूचनांचे ,टीप्सचे तंतोतंत पालन करुन मी उकडीचे मोदक केलेत.त्यामुळे मोदक ..ज्याच्या नावातच मोद -आनंद आहे..तर हे मोदक करताना मला नावाप्रमाणेच आनंद होत होता..अतिशय सुंदर, सुरेख,मऊसर, चविष्ट झाले होते उकडीचे मोदक..Thank you so much सुधाताई या चविष्ट रुचकर रेसिपीबद्दल..😊🌹❤️

उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#Cooksnap_Challenge..

#उकडीचे_मोदक_Cooksnap_Challenge
गोरा गोरा पान छोटा छोटा छान.. हे बडबड गीत आपल्यापैकी बर्‍याच जणांनी लहानपणी ऐकले आहे आणि आणि खूप वेळा म्हटले देखील आहे..आज पुन्हा एकदा लहान होऊन हे गीत म्हणू या..😊
गोरा गोरा पान छोटा छोटा छान
गोरा गोरा पान छोटा छोटा छान
सुपाएवढे कान त्याचे दिसतो किती छान
सुपाएवढे कान याचे दिसतो किती छान
इवले इवले डोळे काळे काळे निळे
इवले इवले डोळे काळे काळे निळे
सोंड कशी छातीवर वाकुडी वळे
मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट
मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट
उंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे
उंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे
मोठे मोठे दात चार याचे हात
मोठे मोठे दात चार याचे हात
एकवीस मोदकांचा एकच घास
एकवीस मोदकांचा एकच घास..
एकवीस मोदक एकाच घासात खाणार्या माझ्या बाप्पासाठी मी @cook_19609542 सुधाताईं नी त्यांच्या live मध्ये दाखवलेली उकडीचे मोदक ही रेसिपी cooksnap केली आहे.. सुधा ताई तुमच्या सूचनांचे ,टीप्सचे तंतोतंत पालन करुन मी उकडीचे मोदक केलेत.त्यामुळे मोदक ..ज्याच्या नावातच मोद -आनंद आहे..तर हे मोदक करताना मला नावाप्रमाणेच आनंद होत होता..अतिशय सुंदर, सुरेख,मऊसर, चविष्ट झाले होते उकडीचे मोदक..Thank you so much सुधाताई या चविष्ट रुचकर रेसिपीबद्दल..😊🌹❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
5-6 जणांना
  1. 4 कपताजा खवलेला नारळ
  2. 3 कपचिरलेला गूळ (जास्त गोड हवं असेल तर जास्त घाला)
  3. 2 टीस्पूनलोणी / साजूक तूप
  4. 2 चिमूटमीठ
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 4 कपमोदकाचं पीठ (नसेल तर तांदुळाचं पीठ वापरा)
  7. 1 टेबलस्पूनतेल अंदाजे उकड मळायला
  8. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    नारळ, गूळ थोडं 1टीस्पून तूप एकत्र करून मंद आचेवर शिजवा. घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून गॅस बंद करा. आणि सारण गार करून घ्या

  2. 2

    उकडीसाठी एका पातेल्यात पावणेचार कप पाणी घ्या

  3. 3

    पाण्यात चिमूटभर मीठ आणि लोणी / साजूक तूप घालून पाणी उकळा. लोणी घातलं तर उकड छान मऊ होते

  4. 4

    पाणी उकळलं की त्यात मोदकाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा

  5. 5

    10 मिनिटांनी उकड गरम असतानाच छान मळून घ्या..आधी वाटीच्या बुडाला तेल किंवा तूप लावून वाटीने उकड मळून घ्या..म्हणजे हात भाजणार नाही..

  6. 6

    उकडीचा छोटा गोळा घ्या. आणि हाताची बोटं वापरून त्याची पारी बनवा..ही वाटीसारखी पारी तयार झाल्यावर तळहातावर ठेवल्यावर हलली पाहिजे.

  7. 7

    पारीत १ चमचा सारण घाला. पारीला हलक्या हाताने कळ्या काढा- जेव्हढ्या येतील तेव्हढ्या कळ्या करा..

  8. 8

    आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप - कळ्या एकत्र करून मोदकाला नाक बनवा. टीप - अंगठा आणि पहिलं बोट वापरून कळ्या एकत्र करा. त्यावेळी हाताचा पंजा पोकळ असला पाहिजे म्हणजे मोदक चेपणार नाही
    मोदकाचं नाक जास्त जाड असेल तर थोडी उकड काढून टाकून ते सुबक करा.

  9. 9

    तयार मोदक ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे सुकणार नाही

  10. 10

    मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. मोदक वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा किंवा केळीचे पान घाला..

  11. 11

    प्रत्येक मोदक पाण्यात बुडवून ताटलीत ठेवाक्षपाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०-२५ मिनिटं लागतात.

  12. 12

    तयार झाले आपले पांढरेशुभ्र उकडीचे मोदक..उकडीच्या मोदकांवर साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवा.नंतर केळीच्या पानात सर्व्ह करा..

  13. 13
  14. 14
  15. 15
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes