मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)

#MBR
मासवडी हा जुन्नर अहमदनगर चा प्रसिद्ध पदार्थ.....
पाहूण्यांसाठी आवडीने केला जातो. जावई येणार
म्हटलं की मासवडी. कदाचित माश्यासारखी दिसणारी वडी म्हणून मासवडी नाव पडले असावे. चवीला खुप अफलातून लागते. आज मी ही रेसिपी मसाला बाॅक्स ह्या थीमसाठी बनवली आहे. चला तर मग बघुया कशी बनवायची मासवडी.....
मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)
#MBR
मासवडी हा जुन्नर अहमदनगर चा प्रसिद्ध पदार्थ.....
पाहूण्यांसाठी आवडीने केला जातो. जावई येणार
म्हटलं की मासवडी. कदाचित माश्यासारखी दिसणारी वडी म्हणून मासवडी नाव पडले असावे. चवीला खुप अफलातून लागते. आज मी ही रेसिपी मसाला बाॅक्स ह्या थीमसाठी बनवली आहे. चला तर मग बघुया कशी बनवायची मासवडी.....
कुकिंग सूचना
- 1
सारण बनवण्यासाठी तीळ, सुकं खोबरं आणि खसखस कोरडीच, निरनिराळी भाजून घ्यावी. गार झाले कि मिक्सरमध्ये सरसरीत दळून घ्यावे..
- 2
कढईत तेल गरम करून त्यात हिंग हळद घालावे. कांदा आणि बारीक चिरलेली लसूण घालून परतावे. कांदा चांगला परतला गेला कि बाजूला काढून ठेवावा आणि गार झाला कि मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना घरगुती लाल तिखट आणि मीठही घालावे. वाटलेले कांद्याचे मिश्रण आणि तीळ सुकं खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करावे. चव पाहून लागेल ते जिन्नस घालावे.
- 3
सारण तयार झाले कि आवरण बनवायला घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, हळद, जीरे, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे. एका मोठ्या बाउल मध्ये पाणी घालावे. पाण्यात मीठ घालावे. त्यात बेसन घालून पाण्यात बेसन पीठ नीट मिक्स करून घ्यावे. गुठळ्या होवू देउ नयेत. फोडणीमध्ये बेसन पीठ आणि पाणी मिक्स केलेले मिश्रण टाकावे मध्यम आचेवर २-३ वाफा काढाव्यात. पीठ शिजले पाहिजे. वाटल्यास थोडे खावून पहावे. कच्चट लागत असेल तर अजून थोडावेळ शिजू द्यावे किंवा पीठ हाताला चिकटत नाही हे बघावे ्
- 4
पीठ शिजले कि कोमट होवू द्यावे. नंतर हातानेच कॉटनच्या कपड्यांवरं मध्यमसर थापावे. यावर तयार सारणाचा पातळ थर द्यावा आणि घट्ट सुरळी करावी. शेवटचे टोक नीट चिकटवावे. वड्या पाडाव्यात.
- 5
- 6
कढईमध्ये तेल तापवावे त्यात मोहरी, जीरे आणि हिंग घालावे आणि घरगुती मसाला घाला आणि मिनिटभर परतवा. कांदा लसुण खोबरे वाटण आणि उरलेले सारण घालून मिक्स करावे. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे. रस्सा बनवण्यासाठी पाणी घाला. पाणी घातल्यावर मोठ्या आचेवर रस्सा उकळून घ्या. त्यानंतर कढईला लागलेली खरवड,मीठ व कोथिंबीर घालून चांगले मंद गॅसवर पाच मिनिटे उकळून घेणे. मासवडी रस्सा तयार आहे.
वड्यांवर रस्सा टाकून बाजरीची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर त्याचा आनंद घ्या. - 7
हा पदार्थ शिजवायला थोडे अवघड आहे पण चवीला अप्रतिम आहे. आणि जर चव चांगली असेल तर सर्वकाही योग्य आहे.😊👍
Top Search in
Similar Recipes
-
मासवडी (maswadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडच्या रेसिपीज १मासवडी हा पदार्थ आमच्याकडे गावी घरोघरी केला जातो. जुन्नर अहमदनगर चा प्रसिद्ध पदार्थ. पाहूण्यांसाठी आवडीने केला जातो. जावई येणार म्हटलं की मासवडी. कदाचित माश्यासारखी दिसणारी वडी म्हणून मासवडी नाव पडले असावे. चवीला खुप अफलातून लागते. shamal walunj -
मासवडी रस्सा (Maswadi rassa recipe in marathi)
एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश जो मुख्यतः बेसन किंवा बेसन, मसाला, कांदा, नारळ, धणे आणि लसूण यांचा वापर करून मुख्यतः पुणे, मराठवाडा प्रदेशात तयार केला जातो. नारळ-कांदा-लसूण पेस्ट, कोल्हापुरी करी मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला आणि काही मसाल्यांचा वापर करून तयार केलेल्या करी किंवा ग्रेव्हीसोबत मासवडी नेहमी दिली जाते. हे गरम सर्व्ह केले जाते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर चांगले जाते. Sakshi Nillawar -
-
मासवडी (maswadi recipe in marathi)
#GA4#WEEK12 की वर्ड -बेसनबेसणपीठ शिजवून ताटावर थापून त्यावर सारण ठेवून त्याचा रोल बनवून ते माशाच्या आकाराचे थापतात व त्याच्या वड्या पाडतात म्हणुन या रेसिपी चे नाव मासवडी आहे...मी या रेसिपी मध्ये वाटीचे प्रमान सांगितले आहे..वाटीचा फोटो आहेच... लता धानापुने -
थापीवडी रस्सा (thapiwadi rassa recipe in marathi)
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव झाल्याच्या नंतर पितृपक्षाचा पंधरवडा असतो त्यामध्ये खाली दिलेले सर्व पदार्थ पितृपक्षा च्या थाळीमध्ये असतात जसे की पूरण पोळी, अळूवडी, कटाची आमटी, गुळवणी, तांदळाची खीर, कांद्याची भजी, थापीवडी, मेथी, गवार, भेंडी, काशी भोपळा, कारले या भाज्या तसेच कढी, भात, कुरडाई, पापड या सर्व पदार्थांचे सेवन करतात.तर, आजची रेसिपी थापीवडी रस्साबेसन पिठापासून ह्या वड्या बनवल्या जातात ह्य वड्या पितृपक्ष थाळीत साईड डिश म्हणून सर्व्ह करतात किंवा त्यांना रश्श्याबरोबर खाण्यासाठी बनवले जाते. जर आपल्याला भाज्या खाण्याचा कंटाळा आला तर ही एक उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश खाण्यासाठी बनवू शकतो. Vandana Shelar -
-
आलू बोंडे रस्सा (aaloo bonda rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 माझ सासर विदर्भातील यवतमाळ. विदर्भातील पातोड्या चिंचोणी हे प्रसिद्ध पदार्थ तर आहेतच .आलू बोंडे रस्साही खूप छान झणझणीत पदार्थ आहे. Arati Wani -
मासवडी (maswadi recipe in marathi)
#skm पुण्याला व्हेजिटेरियन लोकांसाठी हा स्पेशल मेनू असतो. जसे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी चिकन असते. तसेच बाळ जन्माला आल्यावर पाचवीच्या दिवशी हा पदार्थ आवर्जून केला जातो पाहुण्यांसाठी. Reshma Sachin Durgude -
गावरान मासवडी रस्सा रेसिपी (maswadi rassa bhaji recipe in marathi)
#Annapurna_Recipe Rajashree Ravindra Pable -
-
-
फणसाच्या आठळ्या(बिया) ची भाजी (fhansachya chi bhaji recipe in marathi)
#उन्हाळ्यातील सिजनल फळ फणस फणसाचे गरे तर सर्वांनाच आवडतात पण आतील बिया सुद्धा उकडून खातात तसेच त्याची भाजीही करतात ह्या बिया खूपच पौष्टीत असतात लहानमुलांना ह्या बिया खाण्यास द्याव्या त्यांची शारीरीक व मानसिक वाढ चांगली होते. त्यातील मॅग्नेशिअम व कॅल्शियम मुळे हाडे मजबुत होतात . शरीराला उर्जा मिळते. प्रोटिनची कमतरता भरून निघते पचनक्रिया सुधारते. चला तर अशा पौष्टीक फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची ते बघुया आपण Chhaya Paradhi -
मुगवडी रस्सा भाजी (Moongvadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
विकेंड रेसीपी चॅलेंज मुगवडी भाजीह्या मुगवड्या मला माझ्या विहीण सुजाता ताईंनी दिल्या होत्या त्या ही खुप सुगरण आहेत , मुग वडी ही खुप छान झाल्या आहेत, तेंव्हा भाजी खुप छान झाली. Thanks सुजाता ताई Shobha Deshmukh -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cf #मटकीची रस्सा भाजी बरेचदा होते पण आज तुमच्यासाठी तशी पचायला हलकी नी मोड आलेली म्हणजे जीवनसत्वयुक्त .चला तर बघुया कशी करायची ते . Hema Wane -
टमॉटोची चटणी
#लॉक डाऊन टमॉटो सगळयांकडे प्रत्येक भाजीत टाकले जातात त्याचप्रमाणे भाजी नसल्यावर टमॉटोची चटणी आवडीने खाल्ली जाते चला तर बघुया कशी बनवायची Chhaya Paradhi -
मासवडी (maswadi recipes in marathi)
#स्टफड मी पहिल्यांदाच बनवली सर्वाना खूप आवडली Deepali dake Kulkarni -
तवा मसाला प्रान्स (Tawa masala prawns recipe in marathi)
#MBR#मसाला बॉक्स किचन नॉनवेज मध्ये फिशची कोणती ही रेसिपी बनवायची तर ती झणझणीत च व्हायला पाहिजे त्यासाठी मसाल्या डब्यातील मसाले वापरावेच लागतात चला तर असे तिखट मसाले वापरून केलेली प्रान्स ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
#डिनर दुधी भोपळ्यातुन आपल्या शरीराला फायबर्स, व्हिटॅमिन c,B , लोह, मॅग्नेशियम, झिंक, कॉल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज अशा विविध पोषक घटक मिळतात भोपळा आजारांवर उपयुक्त तसेच पित्त कफ कमी करून शरीराचे पोषण करून बल वाढवणारा वजन कमी करतो मधुमेह मुळव्याध हृदयविकारा वर उपयोगी आहे चला तर अशा बहुगुणी भोपळ्याची भाजी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #शुक्रवार_पाटवडी रस्सा#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला) शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा.. आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो.. माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E-book week1 या चॅलेंज साठी किवर्ड मटण रस्सा ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#स्ट्रिट झणझणीत मिसळपाव सगळ्याच्यांच तोंडाला पाणी सुटल ना पोटभरीचे व पौष्टीक नाष्टा किंवा जेवणच म्हणता येईल हल्ली मिसळपाव लहानथोर सगळ्यांच्या आवडीचा मेनु झाला आहे . चला घरी मिसळ कशी बनवायची बघुया Chhaya Paradhi -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
ह्या महिन्यात बाजारात छोट-छोटे भाजीचे कच्चे फणस येतात. ते खास भाजीचे असतात त्याची भाजी खूप छान होते वर्षातून एकदाच येत असल्याने एकदा तरी याची भाजी बनवून खावी चला तर बघूया भाजी कशी बनवायची nilam jadhav -
ज्वारीच्या पीठाची आंबिल(उकड)
#GA4 #WEEK16 #Keyword Jowarज्वारीच्या पीठाची आंबिल हा एक पारंपारिक पदार्थ. पचायला हलका,चवीला उत्कृष्ट,सहज पचणारे उत्तम अन्न.आजारी माणसासाठी अगदी comfort food.करायला सोपे.चटकन होणारे,तसंच पोटभरीचे.लहानथोरांची भूक भागवणारे. आज माझ्या नातीसाठी ही आंबिल केली.ती वर्षाचीच आहे,पण असे पदार्थ आवडीने खाते हे विशेष!!.....त्यामुळे मिरची कढीपत्ता,फोडणी याला वगळून तयार केली. खरंतर ही आंबिल करण्याची पद्धत म्हणजे ज्वारी 7-8तास भिजत घालायची.नंतर स्वच्छ धुवून रोळीत उपसून पाणी निथळू द्यायचे.मग ही ज्वारी फडक्यावर चांगली वाळवून कोरडी करायची.आणि दळून पीठ करायचे.हे पीठ केव्हाही आंबिल बनवण्यासाठी वापरता येते.....पण माझ्या आजच्या रेसिपीसाठी हे करायला जमलं नाही आणि ज्वारीचं पीठ तयारच होतं,त्याचा वापर करुन ही चवदार,पौष्टिक अशी आंबिल तुम्हालाही सकाळच्या ब्रेकफास्टला चेंज म्हणून करता येईल.जवळपास एक भाकरी खाल्ल्यासारखे पोटही भरते.ज्वारी ही थंड आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.भरपूर फायबर व कर्बोदके असल्याने पोट भरण्यासही मदत करते.ग्लुटेन मात्रा अत्यंत कमी असल्याने पचनास हलकी असते.याला जोंधळे,मिलो,मिलेट असंही म्हणतात.पाखरांनाही ज्वारी फार आवडते.ज्वारी कणसं कोवळी असताना हुरडा म्हणून तर फारच प्रसिद्ध आणि आवडीचा प्रकार आहे. आमच्या गावच्या शेतात ज्वारीने किंवा बाजरीने भरलेल्या ताटांचे शेत,खळं हे सगळंअनुभवलंय.त्याची सर विकत घेतलेल्या ज्वारी,बाजरीला येणं अशक्यच!!😋🙏🙏 Sushama Y. Kulkarni -
चिकन करी/रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#GA4 #week15#keyword_chickenआजची माझी रेसिपी चिकन रस्सा.मोजकेच मसाले वापरून केलेली ही सोपी रेसिपी आहे.चला तर मग रेसिपी बघुया 😊 जान्हवी आबनावे -
झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi)
#LCM1झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे. Vandana Shelar -
मसाला अंडा करी (Masala anda curry recipe in marathi)
#MBR #मसाला बॉक्स स्पेशल प्रत्येकाच्या किचनमध्ये रेसिपी करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा त्यात आपण सर्व सुके पावडर मसाले व खडे मसाले ही ठेवतो. चला तर अशा सर्व कलरफुल मसाल्या पासुन च आज मी मसाला अंडा करी बनवली आहे. चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भेंडी बेसन मसाला (Bhendi besan masala recipe in marathi)
#झटपट होणारी व पौष्टीक तसेच सगळ्यांना आवडणारी भाजी भेंडी बेसन मसाला चला तर बघुया कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi
More Recipes
- चिकन मसाला (Chicken masala recipe in marathi)
- वाळवलेल्या मूग,हरभरा डाळ वड्यांची भाजी (Mix dal vadyanchi bhaji recipe in marathi)
- स्पाईसी पनीर व्हेज कढाई (Panner veg kadhai recipe in marathi)
- चमचमीत मसालेदार मटण बिर्याणी (Mutton biryani recipe in marathi)
- कषाय (औषधी चहा पावडर) (Kashaya tea recipe in marathi)
टिप्पण्या (2)