चमचमीत मसालेदार मटण बिर्याणी (Mutton biryani recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#MBR
मसाला बॉक्स रेसिपी

चमचमीत मसालेदार मटण बिर्याणी (Mutton biryani recipe in marathi)

#MBR
मसाला बॉक्स रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास ३० मिनीटे
६ जणांसाठी
  1. 1 किलोमटण
  2. 3/4 किलोतांदूळ
  3. 5कांदे
  4. 2बटाटे
  5. 2उकडलेली अंडी
  6. 2टोमॅटो
  7. 5-6 टे. स्पून तेल
  8. 5-6 टे. स्पून साजूक तूप
  9. 10-12लवंगा
  10. 4हिरव्या वेलच्या
  11. 2मसाला वेलच्या
  12. 2 इंचदालचिनीचे तुकडे
  13. 4तमालपत्र
  14. 6 टे. स्पून आलं लसूण मिरची पेस्ट
  15. 1 टीस्पूनहळद
  16. 4 टीस्पूनसंडे मसाला
  17. 1 टीस्पूनहींग
  18. 2 टीस्पूनघरगुती बिर्याणी मसाला
  19. 1/2 चमचाकेशर २ चमचे दूधात खलून
  20. 15-20काजू तळून
  21. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

२ तास ३० मिनीटे
  1. 1

    प्रथम मटण स्वच्छ धुवून १ टी स्पून हळद, ४ टी स्पून संडे मसाला, ४ टे. स्पूनआलं लसूण पेस्ट, २ टी स्पून मीठ व १ टे. स्पून तेल घालून १ तासासाठी मॅरिनेट करून ठेवले.

  2. 2

    नंतर ५ पैकी ३ कांदे पातळ ऊभे चिरून घेतले व २ कांदे बारीक चिरून घेतले. बटाटे सोलून लांबट ऊभे चिरून घेतले. टोमॅटो ही बारीक चिरून घेतले.अंडी कापून
    ठेवली.

  3. 3

    नंतर ऊभा चिरलेला कांदा व बटाटा तळून घेतला. नंतर एका भांड्यात अंदाजे 1 1/2 लिटर पाणी उकळवत ठेवले त्यांत ४ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, २ तमालपत्र, १ मसाला वेलची, १ चमचा तेल व २-३ चमचे मीठ घातले. तांदूळ धुवून १५ मिनीटे पाण्यांत भिजवून ठेवले. पाणी उकळल्यावर ते तांदूळ त्या पाण्यात घातले व ७०% शिजल्यावर त्यातले पाणी काढून टाकले.

  4. 4

    एका भांड्यात ४ चमचे तेल तापवून त्यांत खडा मसाला घातला व तडतडल्यावर त्यांत बारीक चिरलेला कांदा १/२ चमचा मीठ व बारीक चिरलेला टोमॅटो घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परतवले. त्यांत मॅरिनेट करून ठेवलेले मटण घातले व छान परतवून त्यांत गरजेनुसार पाणी घातले व पाण्याला उकळी आल्यावर त्यांत १ चमचा बिर्याणी मसाला घातला व मटण छान शिजू दिले.

  5. 5

    नंतर एका भांड्यात २ चमचे साजूक तूप घातले त्यां थोडे मटण रश्यासहीत घातले त्यावर भात घातला, त्यावर तळलेला कांदा, बटाटा, अंड्याचे काप व चिमूटभर बिर्याणी मसाला घातला त्यावर परत भाताचा थर, त्यावर मटणाचा थर असे थरावर थर घातले व शेवटच्या थरावर तळलेला कांदा, काजू, कोथिंबीर घालून त्याला भोक पाडून त्यांत केर मिश्रीत दूध व तूप घातले व त्यावर झाकण देऊन २० मिनीटे बिर्याणी ला दम दिला.

  6. 6

    गरमागरम झणझणीत, चमचमीत बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली. कोशिंबीरीसोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes