चिकन मसाला (Chicken masala recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

चिकन मसाला (Chicken masala recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अंदाजे 1‌तास
6 जणांसाठी
  1. 1 किलोचिकन स्वच्छ धुवून
  2. 3मोठे कांदे
  3. 1लसूण कांदा सोलून
  4. 2 इंचआले
  5. 3 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  6. 2 टेबलस्पूनधणे
  7. 3 टेबलस्पूनसुके खोबरे किसून
  8. 1/2 टिस्पून शहाजिरे
  9. 1 तुकडादालचिनी
  10. 3-4लवंग
  11. 1मसाला वेलदोडा
  12. 5-6मिरी दाणे
  13. 2तमालपत्र
  14. मीठ चवीनुसार
  15. तेल गरजेनुसार
  16. हळद
  17. तिखट
  18. 2हिरव्या मिरच्या
  19. 1/2लिंबू रस

कुकिंग सूचना

अंदाजे 1‌तास
  1. 1

    थोडेसे आले,4-5 पाकळ्या लसूण,थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ घालून वाटण करा.लिंबूरस घालून एकजीव करून,चिकनला किमान अर्धा तास चोळून बाजूला ठेवा.

  2. 2

    धणे, जीरे, दालचिनी, लवंग, वेलची,मिरे,सुके खोबरे भाजून घ्या.

  3. 3

    कांदा जाडसर चिरून तेलावर लालसर रंगावर परतून घ्या.नंतर त्यात लसूण आले घाला.हा मसाला किंचित पाणी घालून बारीक वाटावे.

  4. 4

    कढईत तेल घालून तमालपत्र घालावे.वाटलेला मसाला, हळद, तिखट चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

  5. 5

    चिकन आणि गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवून 10-12 मिनिटे मंद आचेवर चिकन मसाला शिजवून घ्या.

  6. 6

    चिकन मसाला पोळी, भाकरी,नान,भात ह्या सोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes