छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

छोले ग्रेव्ही (Chole Gravy Recipe In Marathi)

#GRU #रस्सा, ग्रेव्ही, उसळ, रेसिपीस # गणपती बाप्पाचा नैवेद्य, प्रसाद रोज गोड खाऊन कंटाळा येतो ना चला काहीतरी झणझणीत बनुया छोले ग्रेव्हीची रेसिपी बघुया तर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. ११० ग्रॅम काबुली चणे
  2. 2मध्यम बटाटे
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. २-४ मिरच्या
  6. 2 इंचआले
  7. १५ लसुण पाकळ्या
  8. 1 टिस्पुनजीरे
  9. 1 टेबलस्पुनडाळिंबाचे दाणे
  10. 1 पिंचहिंग
  11. २५ ग्रॅम कोथिंबीर
  12. 1 टेबलस्पुनकसुरी मेथी
  13. 2 टेबलस्पुनछोले मसाला
  14. 1 टिस्पुनकाश्मिरीतिखट
  15. 1टिबॅग
  16. 1मोठी वेलची
  17. 1-2दालचिनीचे तुकडे
  18. 2तेजपत्ता
  19. २-४ काळीमिरी
  20. 1 टेबलस्पुनआमचुर पावडर
  21. 1 टेबलस्पुनधने पावडर
  22. 1/4 टिस्पुनहळद
  23. चविनुसारमीठ
  24. 1-2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा भिजवलेले छोले बटाट्याचे तुकडे, खडा मसाला व टिबॅग व पाणी मिक्स करून कुकरच्या२-३ शिट्टया काढुन घ्या, कांदा, टोमॅटो मोठे कापुन ठेवा

  2. 2

    कांद्याची पेस्ट करून ठेवा तसेच टोमॅटो, मिरच्या कोथिंबीर, आले, लसुण, जीरे, व डाळिंबाचे दाणे मिक्स करून पेस्ट करून ठेवा

  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे मिक्स करून फुलल्यावर त्यात कांद्याची पेस्ट टाकुन चांगले परता नंतर त्यात हळद, काश्मिरी तिखट टाकुन परता त्यात टोमॅटो कोथिंबिर डाळिंबाचे दाणे, आले, लसुण, जि ऱ्याची पेस्ट टाकुन चांगले परतुन शिजवा नंतर त्यात छोले मसाला व थोडो मीठ मिक्स करून२-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  4. 4

    नंतर त्यात कसुरी मेथी मिक्स करून शिजवा शेवटी त्यात उकडलेले छोले व त्यातील बटाटे मॅश करून सर्व मिक्स करा तसेच आमचुर पावडर, चविनुसार मीठ व आवश्यकते नुसार गरमपाणी मिस्क करा व झाकण ठेवुन१० मिनिटे शिजवा मध्ये मध्ये परतत रहा आपले छोले रेडी कोथिंबिर भुरभुरा

  5. 5

    बाऊलमध्ये गरमागरम छोले वरून मिरची व कोथिंबिर पोळी बरोबर डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes