उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

उपवासाची कुरकुरीत साबुदाणा भजी (Sabudana Bhajji Recipe In Marathi)

#SR उपवास म्हणटले की साबुदाणा खिचडीच आपण करतो. मग जरा वेगळे बनवून बघू. मग हा माझा प्रयत्न.. आणि घरात सर्वाना आवडला ही..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
३-४ जणांसाठी
  1. 1 कपभिजवून ठेवलेला साबुदाणा
  2. 2बटाटे किसून घेतलेले
  3. दही
  4. वरई तांदूळ (भगर)
  5. 3-4हिरव्या मिरच्या
  6. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  7. आले
  8. जीरे
  9. कोथिंबीर
  10. साखर
  11. लिंबू
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात १ कप ४-५ तास भिजवून ठेवलेला साबुदाणा घेऊन त्यात अर्धा कप भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेली भगर घेऊन त्यात २ बारीक किसलेले बटाटे, पाव कप दही, हिरव्या मिरच्या, जीरे, आले ह्याची मिक्सरला जाडसर वाटून केलेले वाटप, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लिंबू रस, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून ५-१० मिनिटे बाजूला ठेवा.

  2. 2

    त्यामुळे ह्या मिश्रणाला दह्याचे पाणी सुटेल. आणि मिश्रण चांगले एकजीव होईल. जेणेकरून मिश्रणात अधिक पाणी घालण्याची गरज भासणार नाही.

  3. 3

    आता गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे वरील मिश्रणाचे गोळे सोडा. व खरपूस तळून घ्या.

  4. 4

    गरमागरम साबुदाणा भजी दही किंवा चटणी सोबत सव्हऀ करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes