ज्वारी,कलिंगड पांढरागर थालीपीठ

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#ऊन्हाळ्यातील रेसिपी
कलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगडा चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपज्वारीपीठ
  2. 1/4 कपचण्याचे पीठ
  3. 2 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  4. 3/4 कपकलिंगड पांढरा गर
  5. 1/4 कपमेथी (ऐच्छिक)
  6. 1/4 कपकोथिंबीर
  7. 1/4 कपकांदा
  8. 1टिस्पून लाल तिखट
  9. 1/2टिस्पून हळद
  10. 1 टीस्पूनजीरेपुड
  11. 1/2 टीस्पूनधणेपुड
  12. 1 टीस्पूनआललसूण मिरची पेस्ट
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 2/3 टेबलस्पूनचमचे तेल किंवा तुप

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम कलिंगडाचा पांढरा गर किसून घ्या.

  2. 2

    खालील प्रमाणे तयारी करा.कांदा,कोथिंबीर, मेथी चिरून घ्या.

  3. 3

    आता ज्वारीचे पीठ,बेसन पीठ,तांदूळ पीठ घ्या त्यात वरील सर्व जिन्नस घाला नी पीठ मळून घ्या कलिंगडाच्या गरामध्ये खुप पाणी असते त्यामुळे त्यामधे पीठ मळून होते.

  4. 4

    तवा गरम करायला ठेवा थोडे तेल ग्रीस करा
    खालीलप्रमाणे थालीपीठ थापून घ्या नी तव्यावर टाकून तेल किंवा तुप लावून भाजून घ्या.

  5. 5

    खमंग पौष्टिक थालीपीठ तयार आहे. चटणी,लोण्यासोबत एकदम झकास लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes