चना जोर गरम (Chana Chur Recipe in Marathi)

#स्ट्रीट फूड... काय मग आलीं ना आठवण क्रांती पिक्चर मधल्या हेमा मालिनी च्या गाण्याची चना जोर गरम ...👉
चना जोर गरम बाबू मे लायी मजेदार...चना जोर गरम.. मेरा चना बना है आला... जिस मे डाला गरम मसाला इसको खायेगा दिलवाला... चना चोर गरम..😍
आता लॉक डाऊन मुळे बाहेर जाता येत नाही आणि बाहेर गेलं तरी चना जोर कुठे मिळतो म्हणून किती दिवस तसेच विदाऊट चना जोर राहायचं म्हणून घेतला घरीच करून .
मी जेव्हा शॉपिंगला किंवा बाहेर फिरायला जाते तेव्हा दहा वीस रुपयाचा चना जोर खाल्ल्याशिवाय माझी शॉपिंग किंवा फिरण पूर्ण होत नाही इतका मला चना जोर आवडतो.
...अहो! काय म्हणता कसा केला ?... अगदी सोपी..
माझ्या मुलाने चना जोर बनवण्यात बरीच मदत केलेली आहे अगदी आवडीने.... कारण रेसिपीच अशी आहे.
चना जोर बनवताना मज्जा येते बघा.... कारण चने हे मिठाच्या पाण्यात छान उकळलेले असतात त्यामुळे तसे खाल्ले तरी मस्त स्वादिष्ट वाटतात... आणि हो एक सांगायचं म्हणजे चणे भिजताना दोन तीन किलोचे भिजवावेत कारण ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी करता करता कितीतरी चणे आपल्या पोटाेबात जातात😀 आणि मुख्य म्हणजे हे वाळल्यानंतर अजून थोडेसेच दिसतात. आणि हो हवाबंद डब्यामध्ये छान पॅक करून ठेवले तर आपण जेव्हा म्हटल तेव्हा चना जोर बनवून खाऊ शकतो. चला तर मग बघुया कसा करायचा तो...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणे सहा-सात तास पाण्यामध्ये भिजत घालावे.
- 2
चणे भिजल्यानंतर त्यातलं पाणी निथळून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.कूकरमध्ये पाणी टाकून त्याच पाण्यामध्ये थोडीशी हळद, मीठ घालून कुकरची एकच शिट्टी होईपर्यंत शिजू द्यावेत. चणे जास्त वेळ शिजू देऊ नयेत.
- 3
कुकर मधून चणे शिजल्यावर काढून घ्यावेत व त्यातले पाणी निथळून घ्यावे.
- 4
आणि खरी मजा तर आता आहे आपल्याला आता उकळलेल्या चण्यांना चापट करून घ्यायच आहे. चापट करण्यासाठी आपण बत्त्याने सुद्धा करू शकतो किंवा पुरीच्या मशीनवर चार-पाच चणे ठेवून वरतून प्रेशर देऊन करू शकतो आपल्याला जे सोयीस्कर जाईल त्याने चणे चापट करायचे आहेत.
- 5
आता या चना जोर ला पंख्याखाली किंवा उन्हामध्ये वाळवून घ्यावेत किंवा आपण मायक्रोवेव मध्ये बेक पण करु शकतो.
- 6
आता आपल्याला चना जोर फ्राय करायचा असेल तर फ्राय पण करू शकतो किंवा बेक करून खायचं असेल तर तसा पण खाऊ शकतो.
- 7
आपले चना जोर तयार झालेले आहेत आता त्यावर त्तिखट, मीठ,काळे मीठ,आमचूर पावडर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबूचा रस,टमाटर बारीक चिरलेले,चाट मसाला हे सगळं आपल्या आवडीप्रमाणे टाकून चना जोर गरम चा आनंद घ्यावा आणि घरी केलेला चना जोर कसा लागतो हे मला कमेंट्स मध्ये सांगाव.🙏😍
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या