झुणका भाकरी(Zunka Bhakri Recipe In Marathi)

#BR2
आज मंगळवार शेगावीच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते.अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. 23 फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.
गजानन महाराज योगी पुरूष होते. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास भक्त लांबून येतात..आज आमचा एक ग्रुप शेगाव संस्थानकडून दिलेल्या गुरुचरित्राचे सगळे मिळून पारायण करत आहोत . न चुकता बरीच वर्ष झाली हे व्हाट्सअप वरचे पारायण ग्रुप खूप व्यवस्थित रित्या चालू आहे रोजचे पारायण ,संपुट पारायण असते .त्या निमित्ताने झुणका-भाकरी ठेचा तयार करते आणि नैवेद्य दाखवून परिवाराबरोबर जेवणातून हे पदार्थ घेतो जे आपल्या आरोग्यासाठी योग्यही आहे.
देवाच्या कृपेने आपण अशा आरोग्यदायी प्रसाद तयार करायचे आणि त्याचे ग्रहणही करायचे हेच आपल्याला आपल्या संतांकडून शिकण्यासारखे आहे.
🌺गण गण गणात बोते🌺

Steps
- 1
सर्वात आधी झुणका तयार करण्याची तयारी करून ठेव कांदे कट करून घेऊ लसूण ठेचून घेऊ हिरव्या मिरच्या कट करून बेसन काढून घेऊ
- 2
कडईत तेल तापवून त्यात मोहरी जीरे हिंग लसूण परतून घेऊ हिरव्या मिरच्या परतून घेऊन कांदे टाकून परतून घेऊ
- 3
कांदे परतून झाल्यावर त्यात दिल्याप्रमाणे मीठ मसाले टाकून घेऊ
बेसन टाकून परतून घेऊ - 4
आता थोडा पाणीचा सबका मारून झाकण देऊन वाफेवर बेसन शिजवून घेऊ
- 5
अशाप्रकारे झुणका तयार करून घेऊ वरून कोथिंबीर टाकून देऊ
- 6
बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात मीठ घालून पीठ मळून घेऊन पोळपाटावर भाकरी थापून घेऊन
- 7
तव्यावर भाकरी टाकून एका साईडला पाणी लावून घेऊ आता भाकरी गॅसवर भाजून फुलून घेऊन.
- 8
नैवेद्याचे ताट तयार करू
ताटात भाकरी, झुणका, कांदा हिरव्या मिरच्या लाल मिरचीचा खुडा नैवेद्यात ठेऊ.
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Chetana Bhojak know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Similar Recipes
More Recipes
-

🥕 Spicy Instant Carrot Pickle 🌶️ | Quick & Tangy Homemade Pickle
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Small Batch Chocolate Chip Cookies
Maya’s Wine Bar & Kitchen
-

Surekha Dongargaonkar
-

Ninja_chef
-

Restaurant-Style Chicken Curry in Tomato Gravy
Krishna Biswas
-

Heenaba jadeja
-

Heenaba jadeja
-

Kashmiri chilly garlic chutney
Muniswari.G
-

Salad, cabbage, cucumber, onion
Kulsoom Bukhari
-

Hi, its me! -

Meme
-

Nidra rohtagi
-

mahika mangal
-

Bina Samir Telivala
-

Valentine's Day Special Beetroot and Ragi Mini Idlis
Vaishali Suhas
-

Rida Fatima
-

Fazeela Saleem
-

Paulette Marie
-

Arpita Das
-

TimTim cakes and more
-

Nazia Parveen

Comments (10)