भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)

Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533

भगरीचे धिरडे व बटाट्याची चटणी (bhagriche dhirde v batatyachi chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ★धिरडे
  2. 5हिरव्या मिरच्या
  3. चवीनुसार मीठ
  4. 1/2 वाटीसाबुदाणा
  5. 1 वाटीवाटी भगर
  6. 1/2 वाटीशेंगदाणे
  7. 1/2 वाटीशेंगदाणा तेल
  8. ★ चटणी-
  9. 2बटाटे
  10. 4हिरव्या मिरच्या
  11. चवीनुसार मीठ
  12. 3 चमचेतेल
  13. 4 चमचेशेंगदाण्याचा कूट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम भगर व साबुदाणा तीस मिनिटे भिजु द्या. त्यानंतर ती भगर, साबुदाणा,चार मिरच्या,अर्धी वाटी शेंगदाणे व थोडे पाणी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ते एका वाटी मध्ये थोडे घट्टसर कालवा. त्यात चवीनुसार मीठ टाका

  2. 2

    पॅनमध्ये तेल टाकून त्यात ते मिश्रण टाकून द्या.ते करतांनी गॅस मध्यम आचेवर ठेवा.दोन ते तीन मिनिटे वाफ कोंडवा. त्यानंतर कडेने परत तेल टाकून त्याला पलटी करा.दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घ्या.

  3. 3

    चटणीसाठी 2 बटाट्यांची साल काढून त्यांचे बारीक काप करावे.4 हिरव्या मिरच्यांचे काप करून घ्यावे.कढईत 3 चमचे तेल टाकून त्यात मिरच्या तळून घ्याव्या.त्यात बटाट्याचे काप टाकून चवीनुसार मीठ टाकावे.5 मिनिटाची वाफ कोंडावी.त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकावा व चांगले परतून काढावे.हा झाला आपला छानसा पदार्थ तयार

  4. 4

    हा पदार्थ आपण हिरवी मिरची किंवा दह्या सोबत खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes