केळे घालून रव्याचा गोड शिरा

Samruddhi Shivgan Shelar
Samruddhi Shivgan Shelar @cook_19662085

सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते.

केळे घालून रव्याचा गोड शिरा

सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. अर्धी वाटी साजूक तूप
  2. 1वाटी बारीक रवा
  3. 2ते तीन वाटी दुध
  4. केशर काड्या ६-७
  5. साखर पाऊण वाटी
  6. चमचावेलची पावडर अर्धा
  7. केळे २ नग
  8. काजू व बदामाचे बारीक केलेले काप
  9. मनूका

कुकिंग सूचना

  1. 1

    दुधात केशर घालून दुध गरम करून घ्या.
    एका कढईत अर्धी वाटी साजुक तूप गरम करून घ्या. त्यात मंद आचेवर एक वाटी रवा चांगला परतुन घ्या.
    भाजलेल्या रव्यात केशर घालून गरम केलेले दुध घाला. अगदी चांगले ढवळा.

    रवा फुलला असे दिसले की त्यात साखर घालून परतुन घ्या. साखर चांगली एकजीव होऊन वितळली कि त्यात केळी कुस्करून टाका आणि परता. झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटे परतवा. मग वेलची पावडर, काजू बदामाचे काप व मनुका घालून परता.

    एक वाफ काढा.‌ आणि मस्त बाजूने साजूक तुप घालून गरमागरम सर्व्ह करा. #themasalabazaar

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samruddhi Shivgan Shelar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes