रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ ते ३० मिनिटे
  1. जिरे १/२ लहान चमचा
  2. वाफवलेले बटाटे ३ ते ४
  3. हिरवी मिरची
  4. आमचूर पावडर १ लहान चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. आवरण
  7. वाफवलेले कच्ची केळी २ ते ३
  8. हिरव्या मिरच्या २ ते ३
  9. शिंगाडा पीठ १/३ वाटी
  10. मीठ चवीनुसार
  11. शेंगदाणे जाडसर कूट कोटींगसाठी
  12. तेल तळण्यासाठी
  13. दही सोबत खाण्यासाठी

कुकिंग सूचना

२५ ते ३० मिनिटे
  1. 1

    प्रथम कच्ची केळी वाफवून घ्या मग त्याचे बारीक काप करा

  2. 2

    पॅन गरम करून त्यात थोडं तेल घालावे मग हिरवी मिरची व जिरे घालून परतवून घ्यावे केळी घालून परतवून त्यात आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण परतवून घ्यावे

  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करून थोडे पसरवून त्यात केळ्याचे सारण भरून घ्यावे

  4. 4

    उकडलेले बटाटे घेऊन ते मॅश करावे मग त्यात चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, शिंगाडा पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे

  5. 5

    वरचे आवरण व्यवस्थित बंद करून गोल बॉल बनवून घ्यावे सर्व अश्याप्रकारे बनवून घ्या

  6. 6

    भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करावा त्यात तयार बॉल्स गोळवून घ्या व घट्ट असं वळून घ्या जसे लाडू वळतो तसेच

  7. 7

    सर्व बाजुंनी शेंगदाणे व्यवस्थित लागले पाहिजे

  8. 8

    कढईत तेल गरम करून घ्या तेल तापले की त्यात तयार वडे घालून मध्यम आचेवर तळून घ्या दोन्हीं बाजूंनी लालसर होइपर्यंत तळून घ्या

  9. 9

    अश्याप्रकारे सर्व वडे तळून घ्यावे व किचन पेपर किंवा चाळणीत काढावे

  10. 10

    गरमागरम वडे गोड दही सोबत सर्व्ह करावे

  11. 11

    गरमागरम फराळी वडे तयार आहेत गोड दही किंवा हिरव्या किंवा खजूर चटणी सोबत सर्व्ह करा

  12. 12

    टीप
    वडे मध्यम आचेवर च तळावे नाहीतर शेंगदाणे लवकर लाल होऊन वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत
    आमचूर पावडर आवडीनुसार घालावे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

Similar Recipes