पालक पोहे वडे (palak pohe vade) - in Marathi

Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
Akola

पालक पोहे वडे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे. हे वडे आरोग्यास पोषक असतात कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण हे वडे बनवू शकतो. पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे व सर्वांना आवडतो सुद्धा आणि लहान मुलं तर हा पदार्थ खूप आवडीने खातात. तर आपण बघूया पालक पोहे वडे कसे बनवतात ते-

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3o
4 servings
  1. पालक - २ वाटी
  2. पोहे - १ वाटी
  3. साबुदाणा - १/२ वाटी
  4. हिरवी मिरची - ४
  5. दही - १ वाटी
  6. कोथिंबीर - १/२ वाटी
  7. खाण्याचा सोडा - चिमूटभर
  8. मीठ - चवीनुसार

कुकिंग सूचना

3o
  1. 1

    प्रथम साबुदाणा साधारण ७ ते ८ तास भिजत घालावा.

  2. 2

    पोहे १ मिनिट पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून ते १० मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    पालक बारीक चिरून घ्यावा. नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, खाण्याचा सोडा चिमूटभर, कोथिंबीर टाकावी. सर्व जिन्नस हाताला तेल लावून एकजीव करावे.

  4. 4

    भिजलेला साबुदाणा मिश्रणात घालावा व मिश्रण एकजीव करावे.

  5. 5

    प्लास्टिक कागदावर वडे थापावे. व गुलाबी होईपर्यंत तळावे.

  6. 6

    आता तळलेले वडे प्लेट मध्ये काढून त्यावर दही घालावे. वरून कोथिंबीर टाकून सजावट करावी. आता वडे खाण्यास तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha khandare
Manisha khandare @AnandisRecipe
रोजी
Akola

Similar Recipes