काळ्या वाटाण्याचे सांबार

Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451

कोकणातल्या  स्वच्छंदी आणि खवय्ये माणसाच्या जिभेला रुचणाऱ्या पदार्थांपैकी हा एक  .. इथे काळ्या वाटाण्याचे  पीक देखील अमाप घेतले जाते , आणि  प्रत्येक समारंभात , लग्नकार्यात , केळीच्या पानावर वाढलेले ते काळ्या वाटाण्याचे  सांबार धावत जाऊन जेव्हा बाजूला वाढलेल्या  आंबेमोहोर तांदळाच्या घट्ट खिरीत मिसळते ना , त्याचा घास घेताना  कोण आनंद चेहऱ्यावर पसरतो !

काळ्या वाटाण्याचे सांबार

कोकणातल्या  स्वच्छंदी आणि खवय्ये माणसाच्या जिभेला रुचणाऱ्या पदार्थांपैकी हा एक  .. इथे काळ्या वाटाण्याचे  पीक देखील अमाप घेतले जाते , आणि  प्रत्येक समारंभात , लग्नकार्यात , केळीच्या पानावर वाढलेले ते काळ्या वाटाण्याचे  सांबार धावत जाऊन जेव्हा बाजूला वाढलेल्या  आंबेमोहोर तांदळाच्या घट्ट खिरीत मिसळते ना , त्याचा घास घेताना  कोण आनंद चेहऱ्यावर पसरतो !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4-5 सर्व्हिंग्ज
  1. १ कप = २०० ग्रॅम्स काळे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजवून, चाळणीत निथळून, एका कापडात २४ तास घट्ट बांधून मोड काढलेले
  2. मोठे कांदे = १५० ग्रॅम्स लांब चिरलेले
  3. मोठे टोमॅटो = १२५ ग्रॅम्स, मोठे तुकडे करून
  4. अर्धा कप कोथिंबीर
  5. १ कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
  6. तेल
  7. ७-८ कढीपत्ता
  8. १ टीस्पून हळद
  9. पाव टीस्पून हिंग
  10. ८-१० लसणीच्या पाकळ्या
  11. ४-५ टेबलस्पून मालवणी मसाला
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    काळे वाटाणे एका प्रेशर कूकरमध्ये घालून त्यात ३ कप पाणी व थोडे मीठ घालावे. मंद ते मध्यम आचेवर ४-५ शिट्ट्या येईस्तोवर शिजवावे.

  2. 2

    कुकर थंड झाल्यावर वाटाणे वेगळे आणि त्यांचे शिजलेलं पाणी बाजूला काढून ठेवावे.

  3. 3

    वाटण बनवण्यासाठी खोबरे भाजून घ्यावे. मंद आचेवर ४-५ मिनिटे खरपूस खोबरे भाजून घ्यावे.

  4. 4

    २ टेबलस्पून तेल एका पॅनमध्ये घालून त्यात लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी. कांदा घालून चांगला ७-८ मिनिटे खरपूस परतून घ्यावा. कोथिंबीर, भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे. वाटण थंड झाल्यावर पाऊण कप पाणी साधारण वापरून बारीक वाटून घ्यावे.

  5. 5

    टोमॅटो पाणी न घालता प्युरी करून घ्यावी. पाव कप काळे वाटाणे मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे

  6. 6

    ३-४ टेबलस्पून तेल कढईत गरम करावे. त्यात कढीपत्ता व हिंगाची फोडणी करावी. तेलात हळद व मालवणी मसाला घालून लगेच परतावा नाहीतर करपतो. वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे आणि वाटलेली वाटाण्याची पेस्ट घालावी. नीट एकत्र करून घ्यावे.

  7. 7

    मसाला कोरडा पडला तर शिजलेल्या वाटाण्याचे बाजूला काढलेले पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यावा.

  8. 8

    उकडलेले वाटाणे घालावेत व शिजलेल्या वाटाण्याचे पाणी (२ कप) आणि वरून अजून गरम पाणी (२ कप) घालावं. मध्यम आचेवर सांबाराला एक उकळी येऊ द्यावी.

  9. 9

    उकळी फुटली की आच मंद करावी आणि झाकण घालून शिजू द्यावे. ५-६ मिनिटांनी टोमॅटोची प्युरी घालून मंद आचेवर शिजू द्यावे जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा निघून जात नाही.

  10. 10

    ६-७ मिनिटांत सांबार शिजून तयार होते. गॅस बंद करून वाढेपर्यंत झाकण घालावे म्हणजे ते जरा चांगले मुरते. आंबोळी, घावन किंवा वड्यांसोबत वाढावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Mayekar Singh
Smita Mayekar Singh @cook_20355451
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes