पुडाची वडी(सांबार वडी)

अनघा वैद्य
अनघा वैद्य @cook_22854866

पुडाची वडी तशी हिवाळ्यात करणार पदार्थ ,कारण हिवाळ्यात कोथिंबीर(सांबार) छान मिळतो,हिरवा मटार असतो ,पण आता तसे राहिले नाही,मला आता सुद्धा कोथिंबीर तेवढाच छान, बारीक पानांचा,थोडे फुले असलेला मिळाला आणि माझ्यात कोथिंबीर वडी करण्याचा उत्साह संचारला,मग काय सर्व साहित्य होतेच घरी,आणि आवडीने खाणारे सुद्धा घरीच होते,लागली कामाला.

पुडाची वडी(सांबार वडी)

पुडाची वडी तशी हिवाळ्यात करणार पदार्थ ,कारण हिवाळ्यात कोथिंबीर(सांबार) छान मिळतो,हिरवा मटार असतो ,पण आता तसे राहिले नाही,मला आता सुद्धा कोथिंबीर तेवढाच छान, बारीक पानांचा,थोडे फुले असलेला मिळाला आणि माझ्यात कोथिंबीर वडी करण्याचा उत्साह संचारला,मग काय सर्व साहित्य होतेच घरी,आणि आवडीने खाणारे सुद्धा घरीच होते,लागली कामाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोकोथिंबीर
  2. 1 पाव किसलेले खोबरे
  3. 2मोठे कांदे
  4. 1/2 पाव हिरवी मिर्ची
  5. 1 वाटीशेंगदाणे कूट
  6. 50 ग्रामखसखस
  7. 50 ग्रामतीळ कूट
  8. 50 ग्रामजिरे पावडर
  9. 50 ग्रामकाजू तुकडे
  10. 50 ग्रामकिसमिस
  11. 10 ग्रामचारोळी
  12. 10लसूण कळी
  13. 2 वाटीमैदा
  14. 1 वाटीबेसन
  15. 1/2 किलोतेल
  16. 1लिंबू
  17. चवी प्रमाणे मीठ
  18. चवी प्रमाणे,साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    कोथिंबीर वडी करताना प्रथम वरील साहित्या ची तयारी करून ठेवा,कोथिंबीर 5/6 तास आधीच स्वच्छ धुऊन,कपड्यावर पसरून ठेवा,म्हणजे त्यातील पाण्याचा अंश सुकून जाईल,, कोथिंबीर अगदी कोरडी असणे गरजेचे आहे,त्याने मसाला कोरडा होतो, वडी छान होते.त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्या.त्यानंतर पाती करीत मैदा,बेसन,थोडे मीठ आणि कडकडीत 2 टेबलस्पून मोहन घालून पाण्यानी भिजवून ठेवा,म्हणजे तो मुरेल.

  2. 2

    कढईत प्रथम खोबरा किस परतून घ्या आणि पातेल्यात काढा,त्याच कढईत खसखस हलकी भाजून घ्या,तीळ भाजून पूड करा,शेंगदाणे भाजून पूड करा,जिरे पूड करा,आणि हे सर्व जिन्नस एकत्र करा,कढईत अगदी कमी तेल घालून बारीक चिरलेल्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा लाल होई पर्यंत परतवा,लक्षात ठेवा तेल अतिशय कमी घालूनच,त्यात लसूण चे अतिशय बारीक तुकडे करून घाला,आणि कांदे मिरच्या परतल्या नंतर खोबरकीस मध्ये घाला,त्यात मीठ, थोडे गरज असल्यास लाल तिखट,हळद,चारोळी,काजू तुकडे,किसमिस,घालून शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घाला.

  3. 3

    मसाला छान हाताने मिक्स करा,त्यात अर्धे लिंबू चा रस घाला थोडी साखर घालून त्यालाआणि 15 तसाच ठेवा,त्यानंतर वडी भरायला घेऊ या,एक छोटी पोळी लाटून ती थोडी लांब लाटावी,मसाला भरून तिला नीट बंद करा,बंद करताना थोडे पाणी लावा म्हणजे ती सुटणार नाही आणि तळताना मसाला बाहेर निघणार नाही,,त्यानंतर मंद आचेवर तळून घ्या,,वडी तयार,ती कढी किंवा ताक या सोबत सर्व करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
अनघा वैद्य
रोजी

Similar Recipes