पापलेट फ्राय आणि कढी

Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906

#golenapron3
आठवडा-४
ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी‌ )

नमस्कार मंडळी 🙏
या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.
आणि मी खुश झाले.
कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.
FISH🐠🐠🐠🐠🐠
मी अस्सल कोकणी.
आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.
मग ते मासे सुक्के असो वा ओले......
वाराला काहीही चालतं.
आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.
तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....."

पापलेट फ्राय आणि कढी

#golenapron3
आठवडा-४
ओळखलेले शब्द- fish,रवा, लसूण 🐟🐟🐟🐟 ( मच्छी‌ )

नमस्कार मंडळी 🙏
या आठवड्यातील #goldenapron चे puzzle आले.
आणि मी खुश झाले.
कारण त्यात माझा weakpoint दडलेला होता.
FISH🐠🐠🐠🐠🐠
मी अस्सल कोकणी.
आमचे मुळ अन्नच भात आणि मासे.
मग ते मासे सुक्के असो वा ओले......
वाराला काहीही चालतं.
आमच्याकडे कोकणात वाराच्या दिवशी सकाळी न्याहारीला सुद्धा तांदळाची भाकरी आणि सुकट असते.
तर अश्या या fish चे नाव puzzle मध्ये पाहिले आणि ठरवले की या आठवड्यातील माझी रेसिपी मी तुमच्यासोबत shear करणार ती म्हणजे "पापलेट फ्राय आणि कढी....."

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ व्यक्तींसाठी
  1. ४ मध्यम आकाराचे पापलेट
  2. कढी वाटण साहित्य
  3. पापलेट मध्यम काप करून
  4. १ वाटी ओल्या नारळाचा चव
  5. मोठा कांदा
  6. ७-८ लसूण पाकळ्या
  7. ४-५ लाल सुक्या बेडगी मिरच्या
  8. ४-५ काश्मिरी लाल मिरच्या
  9. २-३ कोकम
  10. १ टेबलस्पून धने
  11. १ टेबलस्पून मालवणी मसाला
  12. १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  13. १/२ टेबलस्पून हळद
  14. चवीनुसार मीठ
  15. १ टेबलस्पून तेल
  16. २ वाट्या पाणी
  17. पापलेट फ्राय साहित्य
  18. २ पापलेट आख्खे
  19. १/२ वाटी कोथिंबीर
  20. ७-८ लसूण पाकळ्या
  21. १/२ इंच आलं
  22. ३-४ हिरव्या मिरच्या
  23. १ टेबलस्पून मालवणी मसाला
  24. १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  25. १ टेबलस्पून कोकम आगळ
  26. किंवा
  27. २-३ कोकम
  28. १ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  29. १ टेबलस्पून रवा
  30. चवीनुसार मीठ
  31. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पापलेट चांगली साफ करून, काप करून धुवून घ्यावी. (नको असल्यास डोक्याकडील भाग आणि शेपटी कडील भाग काढून टाकावा.) आता मिक्सर च्या भांड्यात कढीसाठी लागणारे साहित्य घेऊन जरासे पाणी घालून छान बारीक वाटण वाटून घ्यावे. (वरील प्रमाणाने)

  2. 2

    आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून त्यात पुन्हा १/२ टेबलस्पून मालवणी मसाला घालून १ सेकंद परतून लगेचच त्यात वाटलेले वाटप घालून चांगले मिक्स करून घ्यावे. २ मिनीटे कुकर झाकून तो मसाला शिजु द्यावा. २ मिनीटांनंतर झाकण काढून त्यात आपल्या अंदाजाने पाणी, मीठ, कोकम घालून त्यात पापलेटचे तुकडे घालावेत आणि एक उकळी काढून घ्यावी. आता कुकरचे झाकण लावून १ शिट्टी काढून घ्यावी.(१ शिट्टीत मच्छी शिजते. जास्त शिट्टया केल्यास मच्छी कढीत विरघळून जाईल.) आपली कोकणी पध्दतीची पाप कढी तयार.

  3. 3

    आता आपण जे २ पापलेट फ्राय करण्यासाठी ठेवले आहेत ते घेऊन, नको असल्यास डोक्याकडील भाग आणि शेपुट काढून टाकावी आणि त्याच्या पोटाला दोन्ही बाजूस हलक्याशा २-२ चिरा पाडाव्यात. (जेणेकरुन मसाला आत पर्यंत जाईल.) नंतर आलं,लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर धुऊन मिक्सर च्या भांड्यात घेऊन जरासे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. आता पापलेटवर वाटलेले वाटप, हळद, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, आगळ घालून दोन्ही बाजूने छान चोळून घ्यावे.

  4. 4

    आता एका प्लेट मध्ये तांदळाचे पीठ, रवा, मीठ, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला एकत्र करून त्यात मसाला चोळलेली पापलेट घेऊन घोळवून घ्यावी.

  5. 5

    गॅसवर तवा तापत ठेवून त्यात तेल सोडून तवा तापल्यावर त्यावर रव्यात घोळवलेली पापलेट ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल सोडून तळून घ्यावी. आपली पापलेट फ्राय तयार.

  6. 6

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes