ब्रेड केक

Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722

#व्हॅलेन्टाइन

ब्रेड केक

#व्हॅलेन्टाइन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 12ब्रेड चा स्लाइस
  2. 200ml व्हीपक्रीम
  3. 1 टीस्पूनस्ट्रॉबेरी इसेन्स
  4. 3 टीस्पूनआयसिग शूगर
  5. डेकोरेशन साठी कलरफूल स्विट स्प्रिंकल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम ब्रेडचा स्लाईस चे कडा कापून घेणे

  2. 2

    नंतर एका वाटीमधे आयसिग शूगर घेवून त्यामधे कोमट पाणी घालून शूगर पूर्ण विरघळून घेणे

  3. 3

    नंतर मोठ्या बाऊल मधे व्हीपक्रीम काढून घेणे व त्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स घालून मशीन बीटरने व्हीपक्रीम फेटून घेणे (व्हीपक्रीम फेटून झाल्यावर बीटरने क्रिम वरती उचलून घ्यावे जर क्रिम खाली गळले नाही तर समजावे आपले क्रिम परफेक्ट तयार झाले आहे)

  4. 4

    नंतर तयार व्हीपक्रीम चे दोन भाग करावे एक भाग बाऊल मधे काढून घेणे व त्यामध्ये गुलाबी फूड कलर घालून चमच्याने मिक्स करून घेणे

  5. 5

    नंतर एका ट्रे मधे ब्रेड चा तीन स्लाइस घेवून त्या heart शेप मधे लावून घेणे व त्यावर आयसिग शूगर लावून त्यावर गुलाबी रंगाचे व्हीपक्रीम लावावे अशा पद्धतीने सर्व स्लाइस एकावर एक ठेवून सर्व बाजूंनी व्हीपक्रीम व्यवस्थित लावून घेणे

  6. 6

    नंतर त्यावर कलरफूल स्विट स्प्रिंकल ने डेकोरेशन करावे व उरलेले जे व्हाइट व्हीपक्रीम पाइपिंग बॅग मधे घालून त्याने केकला छान बोर्डर काढावी

  7. 7

    अशाप्रकारे आपला ब्रेड केक तयार झाला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes