चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#किडस
माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा

चॉकलेट ड्रायफ्रूट क्रिस्पी डोसा

#किडस
माज्या लेकीला इडली डोसा हे पदार्थ खूपच आवडतात आणि चॉकलेट च तर काही विचारू नका.मग मी ह्या दोघंच कॉम्बिनेशन केल आणि बनवला चॉकलेट डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपतांदूळ
  2. 1/2 वाटी उडीद डाळ
  3. 2 टेबलस्पूनचणा डाळ
  4. 1 चमचामेथी
  5. 1/4 कपपोहे
  6. 100गरम चॉकलेट
  7. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ. उडीद डाळ, चणाडाळ, मेथी हे सगळं 4 ते 5 वेळा धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवा

  2. 2

    चार ते पाच तासानंतर जे मिश्रण भिजत घातले आहार त्यातील पाणी काढून टाकून त्यात पोहे टाकून ते मिक्सर ला वाटून घ्या मिश्रण एकदूमच बारीक वाटू नका आणि मिश्रण 7 ते 8 तास गरम वातावरनातं ठेवा.(ह्या मिश्रणात मीठ टाकू नका)

  3. 3

    8 तासानंतर मिश्रण चांगले आलेले असेल (आम्ही पीठ आल असा म्हणतो)त्यातील तुम्हाला लागेल तेवढे पीठ एका भांड्यात काडून त्यात चावी प्रमाणे मीठ टाका. ड्रायफ्रूट तुकडे करून ठेवा. आणि चॉकलेट मेल्ट करून ठेवा.

  4. 4

    डोसा तवा गॅसवर ठेवून त्यावर डोसा पीठ पसरवून घ्या गोल आकारात मग थोडं शिजलं कि त्यावर चॉकलेट पसरवा. वरून ड्रायफ्रूट चे तुकडे घाला. झाला डोसा तयार. गरमा गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes