रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ कप - भिजवून(रात्रभर) उकडलेले सफेद वाटाणे
  2. - मध्यम कांदे
  3. - मध्यम बटाटे
  4. - मध्यम टोमॅटो
  5. टेबलस्पून तेल
  6. २ टीस्पून - आले-लसूण पेस्ट
  7. २ टीस्पून - लाल मिरचीपूड
  8. २ टीस्पून - गरम मसाला
  9. २ टीस्पून -धणे-जिरेपूड
  10. अर्धा टीस्पून - हळद
  11. चवीनुसार मीठ
  12. ५-६ - मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  13. १ टीस्पून - आले-लसूण पेस्ट
  14. १ टीस्पून - जिरे-मिरेपूड, नसल्यास दोन्हीपैकी कुठलीही एक पूड घ्यावी
  15. पॅटिस साठी
  16. अर्धा टीस्पून -सैंधव मीठ
  17. अर्धा टीस्पून - ओवा
  18. पाव टीस्पून - आमचूर पावडर
  19. २ टेबलस्पून - बारीक चिरलेली कोथिंबीर
  20. सजावटीसाठी - हिरवी पुदिन्याची चटणी, गोड चिंच-खजूर चटणी
  21. तळलेली शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाच्या फोडी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सफेद वाटाणे रात्रभर किंवा आठ तास भिजवून घ्या. नंतर त्यात पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. बटाटी सोलून त्याच्या छोट्या फोडी कराव्यात.

  2. 2

    कांदे, टोमॅटो बारीक चिरून घ्या. तेल तापवून त्यात हिंग घालून कांदा घालून परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून खमंग वास येईपर्यंत परता.

  3. 3

    परतलेल्या कांद्यात टोमॅटो व सर्व मसाले घालून पुन्हा परता. उकडलेले वाटाणे चमच्याने थोडे घोटून घ्या.आता या मिश्रणात उकडलेले वाटाणे व बटाट्याच्या फोडी घालून पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून बटाटी शिजेपर्यंत रगडा शिजवून घ्या. जरूर वाटल्यास थोडे पाणी घालून रगडा थोडा पातळच ठेवा.

  4. 4

    पॅटिससाठी उकडलेले बटाटे सोलून त्याचा लगदा करावा. त्यात पॅटिससाठी दिलेले सर्व मसाले, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर व मीठ घालून एकजीव करावे. या मिश्रणाचे छोटे गोळे करून चपटे वडे करावेत. तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने पॅटिस खरपूस तळून घ्यावेत.

  5. 5

    आता एका डिशमध्ये तयार पॅटिस ठेवून वरून गरम रगडा घाला. वरून पुदिन्याची चटणी, चिंच-खजूर चटणी, शेव, कोथिंबीर घाला. वरून लिंबू पिळून गरमागरम खायला द्या, 'रगडा पॅटिस '

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes