रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. वडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य -
  2. 1/2 किलोबटाटे
  3. 8-9हिरव्या मिरच्या
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1/2 चमचाहळद
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. फोडणीसाठी तेल
  9. वड्यांसाठी लागणारे बेसनाचे मिश्रण -
  10. 2 वाटीबेसन
  11. चिमूटभरखायचा सोडा
  12. 1/4 चमचाहळद
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. 1/2 इंचआले
  15. तळण्यासाठी तेल
  16. कट साठी लागणारे साहित्य -
  17. 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेेेेेेेेेेेेेेेेला
  18. 1/2 वाटीकिसलेले सुके खोबरे
  19. 8-9लसूण पाकळ्या
  20. 1/2 इंचआले
  21. 5-6काळीमिरी
  22. 5-6लवंग
  23. 1/2 इंचदालचिनीचा तुकडा
  24. 2पाकळ्या चक्रीफुलाच्या
  25. 3-4हिरवे वेलदोडे
  26. 2मसाला वेलदोडे
  27. 1/2 चमचाहळद
  28. 1/2 चमचागरम मसाला पावडर
  29. 3-4 चमचेलाल तिखट किंवा आवडीनुसार कमी-जास्त
  30. 1 चमचाधणे पावडर
  31. 1/4 चमचाजिरे पावडर
  32. चवीनुसारमीठ
  33. तेल
  34. सजावटीसाठी साहित्य -
  35. बारीक चिरलेला कांदा
  36. शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे उकडून घ्यावे.

  2. 2

    मिक्सरमध्ये आलं लसूण हिरवी मिरची यांची पेस्ट करून घेणे

  3. 3

    उकडलेले बटाटे सोलून कुस्करून घ्यावे.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून त्यात केलेली पेस्ट परतावी, त्यातच थोडी हळद घालावी आणि हे मिश्रण आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर बटाट्यात घालून छान मिक्स करून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाचे आपल्या हवे त्या आकाराचे गोळे करून घ्यावेत.

  5. 5

    आता एका बाऊल मध्ये बेसन घेऊन त्यात चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि पान चमचा हळद घालून पाणी घालून भज्यांपेक्षा थोडे दाटसर पीठ करून घ्यावे.

  6. 6

    कढईत तळण्यासाठी तेल तापवून घ्यावे आणि बटाट्याच्या भाजीचे गोळे भिजवलेल्या बेसनाच्या मिश्रणात घोळवून तेलात तळून घ्यावेत. म्हणजे वडे तयार होतील.

  7. 7

    आता त्यावर चिरलेला कांदा, किसलेले खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे आणि गॅस बंद करून सर्व खडा मसाला गरम करून घ्यावा. हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यातच लसूण पाकळ्या, आलं, लाल तिखट, गरम मसाला पावडर घालून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यावी.

  8. 8

    एका पातेल्यात तेल तापवून त्यात केलेली पेस्ट परतावी आणि परतत असताना हळद घालावी. पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतावी मग त्यात हवे तसे अंदाजाने पाणी घालावे आणि उकळी येऊ द्यावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे. चार ते पाच मिनिटे मंद आचेवर उकळून गॅस बंद करावा.कट तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti Patil
Preeti Patil @cook_21452314
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes