आलु मटार पोहे

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#पोहे #फोटोग्राफी
भारतीय खाद्यसंस्कृतीत पोहे हा अगदी प्रत्येक घरात नाश्त्याला केला जाणारा अगदी साधा पदार्थ पण आता रिसर्च नंतर हे सिद्ध झालय की पोहे हा जगातील सर्वात पौष्टिक नाश्ता आहे. पण ह्या #फोटोग्राफी वर्कशॉप मुळे ह्या पदार्था कडे कँमेऱ्याच्या लेन्स मधुन बघायचा केलेला हा प्रयत्न😊 #पोहे #फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 1 कपपोहे पाण्याखाली धुवून निथळत ठेवावे
  2. मध्यम कांदा बारिक चिरून
  3. उकडलेला बटाटा चिरून
  4. ७/८ पान कडीपत्ता
  5. 3/4हिरव्या मिरच्या चिरून
  6. थोडे मटारचे दाणे (मी फ्रोझन वापरले)
  7. 1/4 कपशेंगदाणे
  8. 1/2लींबु
  9. चवीनुसारमीठ
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. 1/2 टीस्पूनधणेपूड
  13. आवश्यकतेनुसार तेल
  14. 1/4 टीस्पूनमोहरी व जीरे
  15. सजावटीसाठी बारिक चीरलेली कोथिंबीर
  16. खवलेला नारळ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    निथळलेल्या पोह्यांवर मीठ,हळद व धणेपूड घालावी

  2. 2

    आता एका लोखंडी कढईत तेल तापल्यावर मोहरी व जीरे घालून फोडणी करावी. शेंगदाणे परतून फोडणीत कांदा परतून घ्यावा. नंतर बटाटे,कडीपत्ता, मिरची परतून फोडणीत पोहे घालून परतून घ्यावे.

  3. 3

    आता मटारचे दाणे,लींबाचा रस,साखर घालून पोहे परतून एक वाफ आणावी व गरमागरम पोहे कोथिंबीर व खवलेले नारळ घालून सर्व्ह करावे.बरोबर फरसाण,शेव असेल तर अजुनच बहार😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes