कांदे पोहे

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#फोटोग्राफी
कांदेपोहे
सर्वदूर महाराष्ट्रात आवडणारा नाष्टा म्हणजे कांदेपोहे...काही ठीकाणी आजही कांदेपोहे कार्यक्रमात मुलगी पसंद आहे असे सांगतात...मध्यप्रदेशात इंदोरी पोहे प्रसिद्ध आहेत..गुजरातमध्ये कांदे न घालतासुद्धा पोहे बनवतात...पण आपल्या अस्सल महाराष्ट्रीयन कांदे पोह्याची सर कोणालाच येणार नाही...सविस्तर स्टेपसहीत रेसिपी खाली दिलीच आहे

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2 कपजाडपोहे (दोनजणांसाठी)
  2. 1कांदा
  3. 1बटाटा
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1/8 कपकच्चे शेंगदाणे
  6. 1/8 कपओले वाटाणे
  7. सजावटी साठी
  8. आवडीप्रमाणेओले खोबरे
  9. आवडीप्रमाणे चिरलेली कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ व साखर
  11. 1/4 कपतेल
  12. 1/2 टिस्पून हळद
  13. 1/2 टिस्पूनतिखट
  14. 1/4 टिस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

  1. 1

    जाड पोहे चाळून बाजूला ठेवा.कांदा,बटाटा,मिरची बारीक चिरुन घ्या.कीसलेले खोबरे व चिरलेली कोथिंबीर घ्या

  2. 2

    तेल गरम झाल्यावर मोहरी टाका.मोहरी तडतडल्यावर मिरची परता.

  3. 3

    चिरलेला बटाटा टाकून परतणे व शिजण्यास झाकून ठेवा.बटाटे शिजल्यावरच पोहे धुवून चाळणीत ठेवा.बटाट्यानंतर कांदे परतणे.

  4. 4

    कच्चे शेंगदाणे,वाटाणे टाकून परतणे. हळद व तिखट टाकून परतणे

  5. 5

    भिजवलेले पोहे टाकून चवीनुसार मीठ व साखर टाका..दोन मिनिटे दणदणीत वाफवा.पोहे तयार झाले

  6. 6

    तयार पोह्यावर मस्तपैकी कीसलेले ओले खोबरे व चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes