शिराळा भजी(दोडका)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#फोटोग्राफी
नमस्कार मैत्रिणींनो
आपल्या जेवणाच्या ताटात तोंडी लावण्याच्या पदार्थाना बरंच महत्व आहे. पुर्वापार पासून त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा प्रयोग केला जातो.यात लोणचं, पापड, मुरंबा, सांडगे, कुरडया आलेच.पण आयत्या वेळी केले जाणारे काही चटपटीत पदार्थ पण असतात. मासे चिकन असणाऱ्या थाळीत तोंडी लावण्याचा एवढा प्रश्न येत नाही. तळलेले मासे, तंदूर चिकन, आम्लेट असले प्रकार ती जागा भरून काढतात.शाकाहारी जेवणातला भजी हा त्यातलाच एक प्रकार. झटपट होणारा आणि चटपटीत.मी बनवलेली शिराळ्याची चटपटीत हेल्दी भजी अक्षरशः पाचव्या मिनिटाला गरमागरम आपल्या प्लेट मध्ये आलेली असतात. सोबत फक्त केचप असलं तरी पुरे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामबेसन पीठ
  2. 1मिडीयम शिराळा(दोडका)
  3. 2 कपपाणी
  4. 1 टीस्पूनहळद
  5. थोडं तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. तेल तळण्यासाठी
  8. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भजी साठी शिराळा धुवून घ्या व शिराळ्याच्या शिरा काढून घ्या.

  2. 2

    डाळीच्या पिठात तांदळाचे पीठ, हळद, मिठ, तिखट, हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करा.ह्या थोडं थोडं पाणी घालून दाटसर मिश्रण बनवा. दहा मिनिटे पीठ बाजूला ठेवा. शिराळा न मोडता ह्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करा.

  3. 3

    गॅस वर तेल गरम करा. गरम तेलात शिराळ्याची एकेक काप अलगद सोडा. उलट सुलट दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या.सॉस बरोबर गरमागरम वाढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes