Banana walnut cake

Vaishali Dangat
Vaishali Dangat @cook_20342689

#bananawalnutcake

केक मलापण खूप आवडतो आणि बरोबर गरम आलं घातलेला चहा मस्त combination ❤️❤️
मग बनवायला सोपा,बिनअंड्याचा, ओव्हनचीही आवश्यकता नाही, जास्त फेटून हात दुखायची पण भानगड नाही, झटपट होणारा हा केक.
एक वाटी मैदा किंवा गव्हाचं पीठ, एक टि.स्पून बेकिंग पावडर, अर्धा टि.स्पून बेकिंग/खाण्याचा सोडा व पाव टि. स्पून मीठ एकत्र चाळून घेतलं. दोन पिकलेली केळी, अर्धी वाटी साखर , अर्धी वाटी दूध, चार टे.स्पून तेल, पाव टि.स्पून दालचिनी पावडर एकत्र मिक्सर मधून पेस्ट बनवली ही पेस्ट एका भांड्यात काढली, ज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्याला तूप लावून व त्यावर मैदा भुरभूरवून घेतला व कुकर किंवा कढईत तळाला एक मूठभर बारीक मीठ पसरवून व त्यावर एखादी पसरट वाटी किंवा पसरट भांडं/स्टँड ठेवून गँसवर गरम करायला ठेवला (preheat) . (या मीठाचा वापर वारंवार करता येतो) . आता भांड्यात काढलेल्या पेस्टमध्ये चाळून ठेवलेलं पीठ/ मैदा मिसळून फेटून घ्यावं, यात आक्रोड(walnut) चे तुकडे, काजू बदामाचे काप, मनुके घालावे, यातील काही वरून टाकावेत. आवश्यकता वाटल्यास थोडं दूध घालून ईडली पीठापेक्षा थोडंसं दाटसर होईल ईतपत घालून पीठ एकजीव करून तूप लावलेल्या भांड्यात ओतून गरम करायला ठेवलेल्या कुकरमध्ये हे काळजीपूर्वक ठेवावं आणि कुकर असेल तर शीट्टी व रिंग काढून घ्यावी व झाकण लावून ४५/५० मिनिटं मध्यम आचेवर केक बेक करण्यासाठी ठेवावा. ४५ मिनिटात केक तयार होतो. सुरीने चेक करून पहावे सुरी कोरडी बाहेर आल्यास केक तयार झाला असे समजावे ् पूर्ण थंड झाल्यावर भांडे एका ताटात उपडे करून केक काढून घ्यावा.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 150ग्रँम मैदा/गव्हाचं पीठ
  2. 1 टी स्पूनबेकिंग पावडर
  3. 1/2 टी स्पूनबेकिंग सोडा
  4. 1/4 टी स्पूनमीठ
  5. 2पीकलेली केळी
  6. 75ग्रँम साखर
  7. 100ml दूध
  8. 1/4 टी स्पूनदालचिनी पावडर
  9. 4टे स्पून तेल

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Vaishali Dangat
Vaishali Dangat @cook_20342689
रोजी

Similar Recipes