कुकिंग सूचना
- 1
काळे वाटाणे 8 ते 10 तास पाण्यात भिजवावेत.नंतर पाणी काढून टाकावे. कुकर मध्ये 2 शिट्या घेऊन शिजवून घ्यावे.
- 2
पॅन मध्ये तेल गरम करावे. व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये हिंग, मिरची, कडीपत्ता, आले लसणाची फोडणी द्यावी.त्यामध्ये कांदा नीट परतवून घ्यावा.कांदा व्यवस्थित शिजल्यावर मिरची व टोमॅटो टाकावेत.टोमॅटो मऊ झाल्यावर धणे पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट चांगले परतून घ्यावे, नंतर शिजवलेला वाटाणा, नारळ व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 3
5 ते 10 मिनिटे वाफेवर ठेवा. उसळी मध्ये पाणी अजिबात घालू नका.बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
काळ्या वाटाण्याची उसळ
#फोटोग्राफी#उसळकोकणातली ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे किंवा आंबोळ्या अतिशय प्रसिद्ध अशी डिश आहे. त्यात काजू घालून केली तर सोने पे सुहागा.... कोकणात चिकनमध्ये किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीत काजुगर घालून आम्हाला आवडतात म्हणून आमची आजी बनवायची. आजी ओले काजू उन्हात सुकवून ठेवायची आणि आम्ही मे महिन्यात गावाला गेलो की पदार्थ करून घालायची आणि येताना गुपचूप तांदळाच्या पिठात किंवा तांदळात घालून काजूगर द्यायची.सध्या लॉकडाउन असल्यामुळे काही आणायला मिळत नाही त्यामुळे आहे त्यात सर्व निभावून घेत आहोत. काजूगर अगोदर आणलेले होते तेच वापरलेत. Deepa Gad -
-
हिरव्या मुगाची उसळ (hirvya moongachi usal recipe in marathi)
#kdr ,हिरव्या मुगाची उसळ ही बनवायला खूप सोप्पी आहे आणि चवीलाही खूप टेस्टी आहे व तसेच हिरवे मूग आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्थी आहे.ही उसळ पचायला खूप हलकी आहे,जर रोज रोज त्याच त्याच भाज्या किंवा आमटी किंवा वरण करून कंटाळा आला असेल तर ही हिरव्या मुगाची उसळ नक्कीच करून बघा. Anuja A Muley -
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
-
-
"झटपट काळ्या वाटण्याची उसळ" (kadya watanyachi usal recipe in marathi)
#ks1 वाटाण्याची उसळ किंवा आमटी ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते... कांदा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण हे या उसळीचा महत्वाचा घटक..!! पण मी जरा हटके आणि पटकन ही उसळ बनवते... चला तर मग पाहूया रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
झणझणीत वाटाणा उसळ
#फोटोग्राफी वाटाणा ची उसळ आपण मिसळ पाव बरोबर पण खाऊ शकतो ...मी आज बनवली आहे ती आपण चपाती या भाकरी बरोबर खाल्ली तर खूप छान लागेल.. Kavita basutkar -
काळ्या वाटाण्याचा सांबारा (kalya vatanyacha sambar recipe in marathi)
कोकणातकुठच्याही समारंभाला ह्या काळ्यावाटाण्याची आमटी करतातच.#kdr Namita Manjrekar -
-
चमचमीत चणा मसाला (chana masala recipe in marathi)
#फॅमिली टिफिनसाठी बेस्ट ऑपशन.भाकरी चपाती सोबत उत्तम, माझ्या घरात ही डिश खूप आवडीने फस्त केली जाते. Prajakta Patil -
-
झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
#फोटोग्राफी कडधान्य आपल्या आहारात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व व पोषकतत्वअसतात. Tina Vartak -
मंगलोरियन सुका कोरी गसी (suka kori gasi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4मंगलोरियन सुका कोरी गसी ही ये चिकनची डिश आहे ती सुक्का किंवा सेमी ग्रेव्ही मध्ये बनवली जाते.एक-दोन वर्षापूर्वी माझे मिस्टर कामानिमित्त सारखे बेंगलोर चेन्नई मंगलोर जात होतो. साउथ में सगळीकडे बहुतेककरून साउथ इंडियन जेवणच मिळते. खूप कमी अशा जागा आहेत जिथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे जेवण मिळते.तसं साउथ माझ्या आवडीचे तिकडचे सुंदर नक्षीकाम केलेली मंदिर सुंदर मोठे अफाट समुद्र उंच अशी नारळाची झाडं नेहमीच आकर्षित करतात. त्यांच्या देवळातली सजावट तिकडचे केलेले नक्षीकाम मला नेहमीच खूप आकर्षित करते.नेहमी तिकडे जात असल्यामुळे त्यांना पिकाची टेस्ट डेव्हलप करणे भाग होते. त्यामुळे नेहमी चिकन खाल्लं जायचं तर असाच एक त्यांचा आवडीचा चिकनचे पदार्थ तिकडे करत आहे. अगदी साउथ इंडियन चव नाही पण थोडा माझा विचार देऊन सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. रेसिपी मध्ये तुम्ही घी ऐवजी जर तुम्हाला आवडत असल्यास शेवटी फोडणीसाठी नारळाचे तेल सुद्धा वापरू शकता. Jyoti Gawankar -
-
खिचडी (khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी सोपी एकदम मस्त फोडणीची खिचडी तेही मातीच्या भांड्यात Amit Chaudhari -
-
काळ्या वाटण्याची उसळ /सांबार (kalyavatanyachi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - माझे माहेर - सासर दोन्ही कोकणातले.मालवणी माणूस अणि मासे यांचे अतूट नाते असले, तरी शाकाहारी जेवणात काळ्या वाटण्याची उसळ/सांबार ओले काजू घालून खास प्रसंगी करतात. त्याबरोबर वडे किंवा आंबोळ्या करतात. आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याची उसळ रेसीपी देणार आहे. Kalpana D.Chavan -
-
-
काळ्या वाटाण्याची उसळ (kadya vatanyachi usal recipe in marathi)
चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात.भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.कोकणात ही भाजी घरोघरी बनवली जाते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
काळ्या वाटण्याचे सांबार (kadya vatanyache sambhar recipe in marathi)
#KS1कोकणात हमखास केला जाणारा म्हणजे काळ्या वाटण्याचे सांबार किंवा उसळ आणि सोबत घावन किंवा आंबोळी म्हणजे एकदम झकास बेत... त्यापैकीच कोकण थिम च्या निमित्ताने मी सांबार करणार आहे..चला तर बघुयात रेसिपी😀😀 Dhanashree Phatak -
-
झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)
सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात. Prajakta Patil -
-
-
रसम (Rasam recipe in marathi)
रसम ही एक साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. भात, इडली सोबत सर्व्ह केली जाते. किंवा सुप प्रमाणे ही पिऊ शकतो. Ranjana Balaji mali -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12154978
टिप्पण्या