स्टफ कॅप्सिकम (भरली ढोबळी मिरची) (Stuff Capcicum Recipe In Marathi)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

सध्या लोक डाऊन मुळे भाज्यांची तशी कमतरता च आहे. ज्या भाज्या मिळतील आणि घरात जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये सर्व करणे चालू आहे. परवा अचानक मला माझ्या घराजवळ एके ठिकाणी मस्त कोळी आणि छोटी ढोबळी मिरची मिळाली( नाहीतर एरवी एकदम मोठी आणि हायब्रीड मिळते). म्हणून लगेच भरली ढोबळी बनवली.
स्टफिंग ची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जितकी कॉम्बिनेशन ते करू तेवढे कमीच.
मी माझी रेसिपी फोटोसहित कॅप्शन मध्ये देत आहे.👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२_३ लोकांसाठी
  1. 1उकडलेला बटाटा (ऑप्शनल आहे)
  2. 6ढोबळी मिरची
  3. अर्धी वाटी शेंगदाणा कूट
  4. 1/4 वाटीओले खोबरे
  5. अर्धा चमचा तिखट
  6. अर्धा चमचा गोडा मसाला
  7. अर्धा चमचाधने पूड
  8. अर्धा चमचाजीरे पूड
  9. आवडी प्रमाणेमीठ,
  10. आवडी प्रमाणेगुळ
  11. कोथिंबीर,
  12. कडीपत्ता
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. अर्धा चमचा जीरे
  15. अर्धा चमचा मोहरी
  16. अर्धा चमचा हिंग
  17. अर्धा चमचा हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    सहा कोवळी ढोबळी मिरची घेणे

  2. 2

    देठ काढून घेऊन फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे सुरीने त्यातील बिया काढून पोकळ करून घेणे.

  3. 3

    छोटा बटाटा,शेंगदाणा कूट, ओले खोबरे तिखट, मीठ, गोडा मसाला,धने जीरे पूड आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घेणे

  4. 4

    वरील सर्व मिश्रण फोटो दाखवल्याप्रमाणे ढोबळी मिरची मध्ये भरून घेणे. (मिश्रणात पाणी घालू नये)

  5. 5

    आता तेल गरम करून त्यामध्ये जीरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता यांची फोडणी करून त्या भरलेल्या मिरच्या घालून वरून थोडेसे पाणी, गुळ आणि गरज प्रमाणे मीठ घालून शिजवून घ्यावे. ग्रेव्ही नको असल्यास वाफेवर शिजवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes