आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

मुलांची आवडती पाककृती

आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)

मुलांची आवडती पाककृती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 8 ते 10 बटाटे(उकडलेले)
  2. 1 टीस्पूनसैंधव मीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  5. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  6. 1 टीस्पूनधणे पावडर
  7. 1/2 टीस्पूनजिरा पावडर
  8. 2 टीस्पूनतांदळाचे पीठ
  9. 1 टीस्पूनरवा
  10. 2 ते 4 लाल हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  11. ५० ग्रँमकोथिंबीर बारीक चिरलेली
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे स्वच्छ धुवून उकडवत ठेवा.उकडल्यावर साले काढून खिचणीवर खिचून घ्या.

  2. 2

    तेल सोडून वरील सर्व साहित्य बटाट्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्या.त्याचा एक गोळा बनवा. हाताला तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे बनवा. गोळ्यावर हलकासा दाब देत टिक्की बनवून घ्या.

  3. 3

    गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा.इथे आपण शॅलो फ्राय करणार आहोत.पॅनमध्ये एका वेळेस चार ते पाच टिक्की सोडा फक्त.एका बाजूने दोन ते तीन मिनिट शिजवून पलटी करा.खूप सुंदर हलका ब्राऊन रंग येतो.असे दोन तीन वेळा करा.खूप जास्त शिजवू नका. टिक्की टिपकागदावर काढून घ्या. केचप सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes