ब्रेड रोल्स(bread rolls recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मुलांच्या आवडीचा टी टाइम स्नॅक्स किंवा बर्थ डे पार्टी मधला आवडता पदार्थ. बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या घरी नक्कीच होत असणार....एकदम सोप्पी रेसिपी..

ब्रेड रोल्स(bread rolls recipe in marathi)

मुलांच्या आवडीचा टी टाइम स्नॅक्स किंवा बर्थ डे पार्टी मधला आवडता पदार्थ. बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या घरी नक्कीच होत असणार....एकदम सोप्पी रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनीटे
  1. 5-6ब्रेड स्लाइस... व्हाईट/ ब्राऊन
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 1 टीस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. चिमूटभरहिंग
  7. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी
  8. 4-5कडीपत्ता पाने
  9. 1 टीस्पूनतेल....भाजीसाठी
  10. 1/4 टीस्पूनमीठ....चवीनुसार
  11. 1टिस्पून लिंबाचा रस
  12. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  13. 1 कपपाणी
  14. तळण्यासाठीतेल

कुकिंग सूचना

१५-२० मिनीटे
  1. 1

    बटाटा उकडून व्यवस्थित कुस्करून घेतला.

  2. 2

    पॅन मध्ये तेल घालून त्यात जीरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता यांची फोडणी केली. त्यात कांदा,आलं लसूण मिरची पेस्ट घालून व्यवस्थित परतले.नंतर त्यात हळद,कुस्करलेले बटाटे, मीठ चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घेतले.गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस घालून मिक्स केले.

  3. 3

    ब्रेड स्लाइस च्या कडा काढून,स्लाइस पाण्यामध्ये बुडवून तळहातावर ठेऊन दोन्ही हातांनी दाबून प्रेस करून घेतल्या.त्यात तयार सारण मधोमध ठेऊन त्याचे रोल करून घेतले.

  4. 4

    सगळ्या स्लाइस चे अशाच पद्ध्तीने रोल करून घेतले.कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात सोनेरी रंगावर रोल तळून घेतले.

  5. 5

    ब्रेड रोल्स टोमॅटो सॉस,पुदिना चटणी किंवा नुसते खायलाही मस्तच लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes