ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला.

ब्रेड बटर मसाला (bread butter masala recipe in marathi)

सरिता बुरडे मॅडम ची ब्रेड बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चटपटीत,यम्मी झाली.मुलांना आणि मला खूप आवडली.मी फक्त साध्या ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
  1. 5ब्राऊन ब्रेड स्लाइस
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 3 टेबलस्पूनबटर
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 5-6कडीपत्ता पाने
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनतिखट
  9. 1/4 टीस्पूनपावभाजी मसाला
  10. 1/4 टीस्पूनमीठ
  11. 2 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  12. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथींबिर

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    ब्रेड चे चार तुकडे करून त्याला बटर लावून दोन्ही बाजूंनी भाजून घेतले.कढईत बटर घालून त्यात जीरे घातले नंतर कांदा,कडीपत्ता परतून घेतला.टोमॅटो चिरून घेतला.

  2. 2

    कांदा लालसर झाला की त्यात चिरलेला टोमॅटो टाकून परतले.नंतर त्यात हळद,तिखट,मीठ,पावभाजी मसाला घालून छान परतून घेतले.

  3. 3

    तयार मासाल्यामध्ये बटर वर भाजून घेतलेले ब्रेड स्लाइस चे तुकडे घालून मस्त मिक्स करून घेतले.मसाला व्यवस्थित सर्व तुकड्यांना लागायला हवा.कोथिंबीर घालून एकदा मिक्स केले.

  4. 4

    ब्रेड बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे.डिश मध्ये काढून घेतले आणि सर्व्ह केले.एकदम चटपटीत मस्तच...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes