क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.
या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.
यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
२ व्यक्ती साठी
  1. 200 ग्रामपनीर पास्ता
  2. 1ढोबळी मिरची
  3. 1कांदा
  4. पाच ते सहा लसूणपाकळ्या
  5. चवीप्रमाणेमीठ
  6. 2 चमचेतेल
  7. 2 चमचेचिली फ्लेक्स
  8. 2 चमचेमिक्स हर्ब्ज
  9. 4 चमचेबटर
  10. 4 चमचेमैदा
  11. 2 कपदूध
  12. आवडीप्रमाणेचीज

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    पास्ता Penne घेणे. गरम पाण्यात टाकून किंचित तेल आणि मीठ घालून शिजवून घ्यावे आणि चाळणीत घेऊन पाणी निथळून ठेवावे.

  2. 2

    ढोबळी मिरची कांदा आणि लसूण वरीलप्रमाणे चिरून घ्यावे. आपल्या आवडी प्रमाणे आपण इतर भाज्याही वापरू शकता.

  3. 3

    या सर्व भाज्या आणि लसूण तेलावर परतून घेणे आणि त्यात थोडे मीठ घालावे.

  4. 4

    व्हाईट सॉस बनवण्यासाठी चार चमचे बटर मध्ये चार चमचे मैदा घालून भाजून घेणे. त्यामध्ये दोन कप दूध घालून शिजवून घेणे. अशाप्रकारे व्हाईट सॉस बनवला आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्ज घातले.

  5. 5

    आता तयार झालेल्या व्हाईट सॉस मध्ये सर्व भाज्या आणि पास्ता घालून एकसारखे करून दोन-तीन मिनिटे शिजवून घेणे.

  6. 6

    तयार झालेल्या पास्ता वर चीज किसून घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes