अंडा बिर्याणी (थोडी हटके)(aanda biryani recipe in marathi)

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#बिर्याणी

अंडा बिर्याणी (थोडी हटके)(aanda biryani recipe in marathi)

#बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलोबिर्याणी राईस
  2. 3तमालपत्र
  3. 2दालचिनी
  4. 4हिरवी मिरची
  5. 1लिंबाचा रस
  6. तेल
  7. तूप
  8. 3 कपकांदे चिरून
  9. 8अंडी
  10. १ कप टोमॅटो बारीक चिरून
  11. 3 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  12. 4 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  13. 1/2 टी स्पूनहळद
  14. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  15. 1/2 टी स्पूनगरम मसाला पावडर
  16. 1कांदा बरिस्ता साठी
  17. 2बटाट्याचे उभे काप तळून
  18. 10 ते बारा पुदिना पाणी
  19. चवीनुसारमीठ
  20. चिमुटभरखाण्याचा पिवळा रंग
  21. चिमुटभरखाण्याचा हिरवा रंग

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम भातासाठी बासमती तांदूळ ३०मिनिटे पाण्यात धुवून निथळून घ्यावा आणि अर्ध्या तासानंतर चवीपुरते मीठ आणि लिंबाचा रस, तमालपत्र,हिरवी वेलची आणि दालचिनी घालून पाणी उकळून घ्यावे.बासमती तांदूळ त्यात 80% शिजवून घ्यावा थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवावा.

  2. 2

    आता जमल्यास सहा एकाच आकाराच्या वाट्या घेऊन त्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यावे आणि प्रत्येकी १-१ अंडे त्यात फोडून घालून वरून जरासे मीठ आणि मिरी पावडर भरून घ्यावी एका पॅन मध्ये पाणी घालून त्यातअंडी घातलेली वाट्या पंधरा मिनिटे उकळून घ्यावेत

  3. 3

    अंडी गार झाल्यानंतरच वाट्यांमधून काढावी. आता पॅनमध्ये थोडे तेल घालून 1 टी स्पून काश्मिरी मिरची पावडर घालून परतून घेऊन त्यात अंडी मंद आचेवर खरपूस फ्राय करून बाजूला ठेवावेत

  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे आणि त्यात कांदा टाकुन तो सोनेरी रंगावर परतल्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो ही परतून घ्यावा आता त्यात आलं-लसूण पेस्ट हळद मीठ लाल मिरची पावडर काश्मिरी मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि मीठ घालून खमंग बिर्याणी चा मसाला तयार करून बाजूला ठेवावे. बरिस्ता साठी एक कांदा उभा चिरून घ्यावा एका कढईत तेल गरम करून त्यात खरपूस तळून बाजूला ठेवावा बटाट्याचे ही उभे काप करून तेसुद्धा सोनेरी रंगावर खरपुस तळुन बाजुला ठेवावेत

  5. 5

    आता बिर्याणी साठी तर रचना करताना लागणारे आपले सर्व साहित्य तयार झालेले आहे. भाताचे तीन भाग करून घ्यावेत. एक पांढरा एक पिवळा आणि हिरवा. त्याचे फोटो काढायला मी विसरले

  6. 6

    एका मोठ्या पातेल्यात आधी बटाट्याचे काप तळाला व्यवस्थित रचून घ्यावेत त्यावर मोकळा केलेला पांढरा भात घालून वरून तयार केलेला खमंग बिर्याणी चा मसाला थोडा थोडा करून घालावा त्यावर ४ अंडी रचून घ्यावीत हा आपला पहिला थर.

  7. 7

    आता दुसऱ्या थरांसाठी घाटामध्ये थोडा खाण्याचा पिवळा रंग मिसळून घ्यावा व तो पिवळा केलेला भात घालून वरून तयार केलेला मसाला सगळ्या त्यात घालावा आता थोडासा उरलेल्या भाता मध्ये हिरवा रंग मिसळून तो वरून घालावा व त्यावर उरलेली चार अंडी रचून घ्यावेत व शेवटी त्यावर हाताने चिरलेला पुदिना बरेचदा व

  8. 8

    आता दुसऱ्या थरांसाठी भातामध्ये थोडा खाण्याचा पिवळा रंग मिसळून घ्यावा व तो पिवळा मोकळा केलेला भात वरून घालून त्यावर उरलेला सगळा बिर्याणी मसाला घालावा आता थोडासा उरलेला भात असेल त्यामध्ये हिरवा रंग मिसळून तो वरून घालावा व त्यावर उरलेली चार अंडी रचून घ्यावीत व शेवटी त्यावर हाताने चिरलेला पुदिना बरिस्ता व तूप घालावे हे पातेले तव्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवावे आणि मंद आचेवर दहा मिनिटे एक वाफ येऊन द्यावी ही झाली हटके स्टाइल अंडा बिर्याणी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes