पॉकेट स्टफ्ड रोस्टेड पापलेट(pocket stuffed roasted paplet recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

पावसाळा सुरू होण्यापूर्वी, बोटी किनाऱ्यावर लागण्यापूर्वी मच्छिमार बांधवांनी समुद्रातून आणलेले ताजे पापलेट हाती लागले. त्यांना पाहून खास ठेवणीतली पापलेटची रेसिपी बनविण्याचे ठरवले. खरे तर ही रेसिपी चुलीवर, पाट्यावर वाटलेल्या वाटणासोबत शिजवली जाते. पण उपलब्ध साधनात, थोड्या कल्पकतेने आपण घरी सुद्धा हा प्रयोग करु शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ माणसांसाठी
  1. 8-9पापलेट (साफ करून मधे pocket केलेले)
  2. 1 वाटीखवलेला ओला नारळ
  3. 1/2 वाटीलसूण पाकळ्या
  4. 2 इंचआल्याचा तुकडा
  5. 10-12हिरव्या मिरच्या
  6. 1/2 वाटीकोथिंबीर
  7. 1मोठे केळीचे पान (लहान तुकडे कापून)
  8. चवीनुसारमीठ
  9. तेल अजिबात नाही

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पापलेट साफ करून त्यात pocket बनवून घ्यावे. आणि त्याला मीठ व लिंबू लावून अर्धा तास मँरिनेट करावे.

  2. 2

    आता खवलेला नारळ, लसूण, आले, मिरची, कोथिंबीर व थोडेसे मीठ घालून मिक्सर मधून वाटून घ्यावे. आता मँरिनेटेड पापलेट मधे ते भरून घ्यावे. (चित्रात दाखविल्याप्रमाणे).

  3. 3

    केळीच्या पानात पापलेट ठेवून toothpick ने बंद करावे व तव्यावर टाकावे. वरून एखादे ताट ठेवावे जेणेकरून केळीचे पान व पापलेट यात गॅप राहणार नाही व त्यांचा गरम तव्याला व्यवस्थित स्पर्श होईल.

  4. 4

    एका बाजूने खरपूस भाजल्यावर परतवून घ्यावे.
    आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजल्यावर गरमागरम 'पॉकेट स्टफ्ड रोस्टेड पापलेट' खाण्यासाठी तय्यार...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या (2)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Super se bhi uper.... My all time favorite.... Fish.... I am loveing it 🥰💕💕

Similar Recipes