फ्लॉवरची कोफ्ता करी(flowerchi kofta curry recipe in marathi)

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#कोफ्ता

फ्लॉवरची कोफ्ता करी(flowerchi kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
३ जणांसाठी
  1. कोफ्त्यासाठी
  2. ५०० ग्रॅम vफ्लॉवर
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. 1/4 कपकोथिंबीर बारीक चिरून
  5. 1 टीस्पून ओवा
  6. 1/4 टी स्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  7. 1/2 कपबेसन (अंदाजे)
  8. 1/4 टी स्पूनतूप
  9. चवीनुसारमीठ
  10. करीसाठी
  11. 2कांदे
  12. 2टोमॅटो
  13. दहा-बारा लसूण पाकळ्या
  14. 3 इंचआलं
  15. 2तमालपत्र
  16. 1 टीस्पूनहळद
  17. 2 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  18. 1 टिस्पून जिरा पावडर
  19. 1 टी स्पूनधणा पावडर
  20. 1 टी स्पूनगरम मसाला पावडर
  21. 1/4 कपकोथिंबीर
  22. 1 टी स्पूनजिरे
  23. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्वात आधी फ्लॉवरची फुले स्वच्छ धुऊन किसणीवर किसून घ्यावीत किंवा मिक्सरमधून भरड काढून घ्यावी. त्यानंतर त्यातील पाणी हाताने पिळून पूर्णपणे काढून घ्यायचे आहे.मग त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या,कोथिंबीर, ओवा,लाल मिरची पावडर आणि थोडे थोडे करून बेसन घालून नीट मिक्स करून घ्यावे

  2. 2

    आता कढईत तेल तापायला ठेवावे कोफ्त्याच्या मिश्रणात तूप आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करणे आणि त्याचे गोळे तयार करून ठेवणे. तेल तापल्यावर ते गोळे एकेक करून तेलात सोडून मंद आचेवर तळून घेऊन बाजूला ठेवावेत.

  3. 3

    आता फोडणीसाठी पॅनमध्ये थोडे तेल टाकून घेऊन त्यात जीरे तडतडवून घेणे. उभे कापलेले कांदा-टोमॅटो आलं आणि लसूण त्यात परतवून घेणे. गार झाल्यानंतर त्याची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

  4. 4

    आता फोडणीसाठी परत पॅनमध्ये तेल तापवून घ्या त्यात तमालपत्र घालून नंतर वरील मिक्सर मधील पेस्ट घालून पाच ते दहा मिनिटे परतून मग मग त्यात काश्मिरी पावडर हळद धनाजीराव पावडर गरम मसाला आणि मीठ घालून खमंग परतून घ्या.व्यवस्थित परतल्यानंतर त्यात तीन कप पाणी घालून उकळी येऊ द्या आणि पाणी जरा जास्तच असू द्यावे कारण कोफ्ते घातल्यानंतर ते ग्रेव्ही शोषून घेऊन ग्रेव्ही दाटसर होते.

  5. 5

    उकळी आल्यानंतर मंद आचेवर तळलेले कोफ्ते ग्रेव्हीमध्ये घालून पाच मिनिटे त्यात मुरु द्यावे आणि गरम गरमच पोळी फुलके किंवा पराठ्याबरोबर सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes