दाबेली रोल (dabeli roll recipe in marathi)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

दाबेली रोल (dabeli roll recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 5-6उकडलेले बटाटे
  2. 7-8ब्रेड चे स्लाइस
  3. 1 टेबलस्पूनदाबेली
  4. चवीनुसारमीठ
  5. 1-2 टेबलस्पूनचिंचेची चटणी
  6. 1-2 टेबलस्पूनशेव
  7. 1कांदा (बारीक चिरलेला)
  8. 1-2 टेबलस्पूनबटर
  9. 1 टीस्पूनतेल
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. 2-3 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे
  12. 2 टेबलस्पूनभाजलेले शेंगदाने

कुकिंग सूचना

15-20 मि
  1. 1

    सगळ्यात अगोदर एका प्यान मध्ये तेल गरम करा आणि त्यात दाबेली मसाला घाला आणि छान परतुन घ्या.

  2. 2

    मसाला कमी आचेवर परता जेणेकरून तो जळणार नाही.

  3. 3

    आता त्यात उकडलेले बटाटे घाला आणि छान मैश करूण घ्या.1 -2 चमचे पानी घाला म्हणजे बटाटे लवकर मैश होतील आणि मसाला पन छान मऊ बनेल.

  4. 4

    थोड मीठ घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.स्टफिंग तयार आहे.आता तयार स्टफिंग एका प्लेट मध्ये काढून व्यवस्थित पसरवून घ्या.त्यावर डाळिंबाचे दाणे,भाजलेले शेंगदाने आणि थोड़ी कोथिंबीर भूरभूरा.

  5. 5

    आता एक ब्रेड घ्या त्याचे काठ सुरिने कापून घ्या आणि लाटन्याच्या मदतीने ब्रेड लाटून घ्या.

  6. 6

    आता ब्रेड वर चिंचेची चटनी पसरवून घ्या.त्यावर तयार स्टफिंग ठेवा आणि ब्रेड ला रोल करून घ्या.कडा व्यवस्थित बंद करून घ्या.आवश्यकता असल्यास थोड पानी लावा जेणेकरून कडा व्यवस्थित बंद होतील.

  7. 7

    अश्याप्रकारे सर्व रोल तयार करुन घ्या.आता प्यान वर बटर घाला त्यावर ब्रेड रोल ठेवा आणि दोन्ही बाजुनी छान सोनेरी होइपर्यंत भाजून घ्या.

  8. 8

    अश्याप्रकारे सर्व रोल भाजून घ्या.तयार दाबेली रोल प्लेट मध्ये काढून घ्या त्यावर कोथिंबीर,चिरलेला कांदा, शेव, डाळिंबाचे दाणे घाला.दाबेली रोल तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes