दाबेली (dabheli recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#आई..... ही रेसिपी लीहिताना मला अत्यंत आनंद होतोय. कारण असे की ही रेसिपी मी आज माझ्या माहेरीच केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की ही माहेरी कशी काय? माझं माहेर हे नागपूरचचं. आत्ताच मी बारा दिवस झाले आत्या झाली आहे.😊 तेव्हा माझ्या भाच्याचा नामकरण सोहळा काल होता. आत्या शिवाय तो पार कसा पडणार😍 लॉक डाऊन असल्यामूळे अगदी शॉर्टकट मध्ये तो आम्ही पार पाडला. आणि त्यामुळे मला माहेरी राहण्याचा योग आला. माझ्या मम्मीला स्वीट डिश फार आवडतात आणि स्ट्रीट फूड सुद्धा. स्वीट डिश तर लाँक डाउन मध्ये बऱ्याचदा करण्यात आल्या. तेव्हा तिला आज दाबेली खाण्याची इच्छा होती आणी मी तिला करून खाऊ घातली. कूकपॅड वर आईची फेवरेट डिश ही थीम आली तेव्हा मला खरं सांगू का एवढा आनंद झाला कारण मी माहेरीच होते. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने मदर्स डे स्पेशल ही थीम सार्थक झाल्या चे समाधान वाटले. धन्यवाद कुकपँड.🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. दाबेली साठी लागणारे साहित्य
  2. 1पॅकेट पाव
  3. 6उकडलेले बटाटे
  4. 1 वाटीचिंच खजुराची चटणी
  5. 1 वाटीलसणाची चटणी
  6. 1 /2 वाटी खारा शेंगदाणा
  7. 1 वाटीडाळिंबाचे दाणे
  8. 1 वाटीबारीक चिरलेला कांदा
  9. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 वाटीबारीक शेव
  11. 2 टेबल स्पूनखोबरं कीस
  12. 4 टेबलस्पूनदाबेली मसाला
  13. 500 ग्रॅमबटर
  14. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तव्यावर दोन टेबल स्पून तेल टाकून, तेलामध्ये चार टेबल स्पून दाबेली मसाला टाकावा. एक मिनिट तेलामध्ये परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये चार टेबलस्पून चिंच खजुराची चटणी टाकावी. अर्धा मिनिट परतून झाल्यावर त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मँश करून टाकावे. नंतर पाच मिनिटे हे पूर्ण जिन्नस कमी गॅसवर छान परतून घ्यावे. व एका पसरट भांड्यामध्ये टाकुन द्यावे.

  2. 2

    नंतर त्या पसरट भांड्यामध्ये टाकलेल्या जीन्नसांमध्ये खोबर्‍याचा किस,डाळींबाचे दाणे, कोथिंबीर, शेव हे सगळं एक-एक टेबलस्पून टाकावे. आणि चमच्याने हे दाबेलीच सारण दाबावे. जेणेकरून ते आलू मधे दबून राहील.

  3. 3

    नंतर पावाला अर्ध्यातून कट करून खालील भागाला लसणाची चटणी लावावी त्यावर आलूचा सारण भरावं त्यावर शेव, बारीक चिरलेला कांदा,डाळिंबाचे दाणे, खारा शेंगदाणा टाकावा मग त्यावर परत आलुच सारण टाकून पाव बंद करावा.

  4. 4

    नंतर तव्यावर दोन टेबलस्पून बटर टाकाव व त्यावर दोन्ही बाजूने बंद केलेला पाव शेकून घ्यावा. तयार झालेली दाबेली शेजवान चटणी,टोमॅटो सॉस, शेव,बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर प्लेटमध्ये दाबेली च्या बाजूला ठेवून खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes