सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#goldenapron3
week25
संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले.

सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)

#goldenapron3
week25
संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २५० ग्रॅम रवा
  2. ५०० मिली लिटर दूध
  3. २०० ग्रॅम साखर
  4. १०० ग्रॅम तूप
  5. 2 टीस्पूनकाजू आणि बदामाचे काप
  6. 1/4 टीस्पूनकेशर काड्या

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    कढई मधे आधी रवा कोरडाच भाजून मग त्यात तूप घालून खमंग भाजून घ्यावा. म्हणजे रवा लवकर भाजला जातो.

  2. 2

    भाजलेल्या रव्यामधे कडकडीत केलेले दूध हळूहळू घालत रवा ढवळत रहावा म्हणजे रव्याचा गोळा होणार नाही, गरम दूधामुळे रवा मोकळा शिजेल. कढईवर झाकण ठेवून रवा शिजवून घ्यावा.

  3. 3

    शिजलेल्या रव्यामधे केशर घातलेलं दूध घालून मिक्स करावे. मग साखर घालून ढवळून झाकण ठेवून वाफ आणावी. आणि शिरा बनवून घ्यावा.

  4. 4

    मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून साचा बंद करुन त्यात शिरा दाबून भरावा. आणि साचा अलगद उघडावा. सुंदर आणि सुबक असे शिरा मोदक छानच दिसतात.

  5. 5

    एका प्लेटमधे नैवेद्यासाठी बनवलेले शिरा मोदक ठेवून त्या मोदकांना केशराची काडी लावली. मोदकांच्या आजूबाजूला काजू बदामाचे काप घातले आणि गणपती बाप्पांना सात्त्विक शिरा मोदकांचा नैवेद्य दाखवला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes