कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमत
पावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारा
वारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते.
यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झाली
आज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..
कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमकर्टूले
  2. 2बारीक चिरलेला कांदा
  3. 1 1/2 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  4. 25 ग्रॅमभिजवलेली मूग डाळ
  5. 1 1/2 टीस्पूनकश्मिरी लाल तिखट
  6. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम करटुले धुऊन घ्यावे व त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्या वाटल्यास बिया काढून घ्याव्या एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिर हिंग घालून कांदा घालावा कांदा थोडा खरपूस झाला की त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान परतावे

  2. 2

    परतलेल्या कांद्यामध्ये बाकी मसाले घालावे जसे तिखट मीठ धने पूड जिरे पूड हळद छान परतून घ्यावे मग त्यामध्ये भिजलेली मुगाची डाळ व करटुले घालावे व एकजीव करून घ्यावे

  3. 3

    आता एकजीव केलेल्या भाजीमध्ये थोडे पाणी शिंपडावे व झाकण ठेवून दहा मिनिटे छान वाफ येऊ द्यावी नंतर झाकण उघडून भाजी पुन्हा छान एकजीव करावी व गरम गरम पोळी सोबत सर्व्ह करावी कर्टुल्याची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या (2)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
खूप वेगळी भाजी आहे. थँक्यू फॉर शेअरिंग

Similar Recipes