कर्वन्द चा मोरांबा (karwand cha muramba recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंमत
"दिल है के मानता ही नही..."
नाही नाही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी तर रानमेवा बद्दल बोलत होती.. वर्षातून एकदाच पावसाळ्यात
ते ही काही दिवसच मग तुम्हीच सांगा मन कसे तृप्त होईल. अणि उन्हाळ्या सारखे वाळवण करुन साठवून पण नाही ठेऊ शकत.
मग करायचे तरी काय बस विकत आणल्या आणल्या फस्त करायचे की काय... असाच विचार करत करत घरात करवन्द आणले अणि पावसाळी वातावरणा मुळे वेगवेगळे आजारपण वर तोंड काढतांना दिसतात जिभेची चव पण पळून जाते अश्या वेळेस करवन्दाचा मोरांबा गुण्कारी ठरतो.. आणी तो मुलांनाही आवडावा म्हणून थोडा बदल केला तो कळेलच माझी ही रेसिपी वाचतांना... चला तर करु या का सुरवात...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30  मिनिट
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 130 ग्रॅमकर्वन्द
  2. 130 ग्रॅमसाखर
  3. 5-6लवंग
  4. 1/2 टीस्पूनलाल रंग

कुकिंग सूचना

30  मिनिट
  1. 1

    मला बाजारात छान लाल कर्वन्द मिळालीत ती स्वछ धुन घेतली व टोचे मरुन घेतले तुम्ही हवे तर मधून लांब कापुन बी काढुन पण घेऊ शकता. गैस वर पॅन गरम करण्यास ठेवावा व लगेच त्यात कर्वन्द साखर आणी लवंगा घालाव्यात. व स्लो गैस वर साखर विरघळे पर्यंत परतावे.

  2. 2

    साखर पुर्ण विर्घळे पर्यंत सतत हलवत रहा जेणे करुन साखर चिकटणार नाही आणी साखर एकदा विर्घळली की साधारण घट्ट करा किंवा तुम्हाला आवडत अस्ल्यास एक तारी पाक सारखी कन्सीस्टन्सि आली की गैस बन्द करुन त्यात लाल रंग घालुन एकजीव करुन घ्या व थंड झाले की बरणीत भरून एक दिवस छान मुरत ठेवा व मग रोज एक खाल्यास शरीराला पोषक अशी जीवनसत्वे मिळतील... आणी लहान मुलांना कर्वन्दची चेरी म्हणून पण देऊ शकतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes