गरम बुंदा चाट (garam bunda chat recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#रेसिपीबुक #week5
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरम-गरम खाण्याची मजा वेगळीच असते. चाट असली तर काय विचारायलाच नको. नवीन काहीतरी चार्टमध्ये हवं असं व मुलांनी सांगितल्यावर गरम-गरम काहीतरी चटपटीत हवं. ही गरम-गरम चाट एकदम वेगळी आहे आणि खूप छान आहे खूप स्वादिष्ट आहे. विशेष आभार मानायचे आहेत ते अंजली मॅडम चे स्वरा मॅडम चे आणि अंकिता मॅडमचे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सर्व करू शकले थँक्यू सर्वांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमउडदाची डाळ
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1कांदा बारीक कापलेला
  4. 2मिरच्यांचे बारीक तुकडे
  5. 1/2 इंचआले
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 चुटकीहिंग
  8. 2 टेबलस्पूनदाबेली मसाला
  9. 1/2 टिस्पून तिखट
  10. 1/2 टीस्पूनधणे-जिरे पावडर
  11. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  12. 50 ग्रॅमगोड दही
  13. 2 टेबलस्पूनहिरवी चटणी
  14. 2 टेबलस्पूनखजूर चटणी
  15. 2 टेबलस्पूनबारीक शेव
  16. 2 चमचेहिरवी कोथिंबीर
  17. मीठ स्वादानुसार

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    सर्वप्रथम उडदाची डाळ चार तास भिजत टाका. नंतर ती मिक्सरमधून वाटून घ्या. आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक कापलेली मिरची घालावी. व शेवटी मीठ घालावं. हे मिश्रण चमच्याने चांगले फेटून घ्यावे. आता यात किसलेले आले घालावे. पुन्हा एकदा चांगले फेटून घ्यावे.

  2. 2

    आता एका नॉनस्टीक पॅनमध्ये तेल टाकून घ्या. तेल तापल्यावर त्यात हिंग व दाबेली मसाला टाकावा. आता त्यात तिखट टाकावे व दोन टेबल स्पून पाणी टाकावे. आता या उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालावे व मीठ घालावे. व मिश्रण चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    आता एका कढई मध्ये तेल टाकून चांगले गरम तापू द्यावे. आता यात उडदाच्या डाळीचे छोटे छोटे पकोडे तळावे. पकोडे चा आकार खूप छोटा असावा. ते चांगले लाल रंगावर तळून घ्यावे.

  4. 4

    आता हे गरम गरम पकोडे एका डिश मध्ये घ्यावे. त्यावर बटाट्याच्या भाजीचा थर द्यावा. व परत पकोडे ठेवावे. आता यावर गोड दही त्यावर हिरवी चटणी त्यावर खजुराची चटणी घालावी घालावी. वरून चाट मसाला बारीक शेव व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे. गरम गरम चाट खाण्यात पावसाळ्यात वेगळीच मजा येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes