बेल सरबत (bel sarbat recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#श्रावण
घरातल्या हॉल च्या खिडकीत उभी राहुन समोरच्या घरातील बेला चे झाड पहात होती. किती ते फळानी लदबद्लेले. मागू का एखादं! असे आले मनात पण नक्को थोडे संकोचल्या सारखे झाले.
पिकले की आपसुकच तुटून पाडायचे.. रस्त्यावरचे सगळ्यानं समोर कसे उचलायचे... पडून किती वेळ झाला असेल... चांगले असेल का... किती तरि प्रश्ण उभे असायचे पण म्हणतात्त ना " दिल से अगर कोई चीज़ चाहो तो ऊसे पुरी कायनात तुम्से मिलाने की कोशिश करती है"
बस एकदम तसेच काही झाले त्या दिवशी.. लॉन्ग ड्राइव वरुन रात्री घरी आलो नवर्याने कार पार्क केली आणी मी गेट बंद करण्यास गेली तर काय समोरच्या घरच्या टीना च्या शेड वर दण्णकन आवज झाला आणी बेल फळ चक्क माझ्या समोर येउन पडले. काय तो आनंद झाला पटकन उचलले आणी आणले घरात एकदाचे. बेल किती औषधी युक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी पण मी जे सरबत करुन दाखवणार आहे त्या अनुसार थोडी फार उपयुक्त माहित तुमच्या साठी.. उन्हाळ्यात गर्मी पासुन सुट्का,रक्त शुध्द करणे,ऐसिडिटी, डीहायड्रेशन आणी बरेच काही...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनीट
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमबेल फळ चा गर
  2. 500 ग्रॅमपाणी
  3. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1/2 टीस्पूनकाळ मीठ
  6. 1/2 टीस्पूनजीरे पुड
  7. 2 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

35 मिनीट
  1. 1

    प्रथम बेल फळ फोडून घ्या व लागेल तसा गर काढा मी तिघांन साठी जवळपास 100 ग्रॅम घेतला

  2. 2

    आत्ता हा गर एका भण्ड्यात घेउन त्यात गर बुड़ेल इतके पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवावे व अर्ध्या तासानी गर हलक्या हातानी चोळून घ्यावा बिया व रेषे सुटे पर्यंत

  3. 3

    आता हे मिश्रण गाळून घेणे व किती घट्ट किंवा पातळ आपल्याला हवे तसे पाणी घालावे (पाणी थंड घातले तरी चालेल किंवा सरबत तयार झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवले तरी चालेल) आता त्यामध्ये पिठीसाखर मीठ काळमीठ जिरेपूड घालून ढवळून घ्या

  4. 4

    आता त्यामध्ये निंबाचा रस घालून पुन्हा ढवळून घ्या व ग्लासमध्ये सर्व्ह करावे बेलाचे सरबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes