हेल्दी बिटरुट सूप (healthy beetroot soup recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#सूप

बिट,,गाजर हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजचा आहारात बिटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्या शरिराचा होतात.बिट मधे अनेक आरोग्यदायी पोषक घटक जसे कॅल्शियम,पॉटेशियम, मॅग्नेशियम,फोस्फरस,विटामीन B1,B2 आणि C,आयर्न,पॉलिट ॲसीड असते.
बिट मुळे उच्चरक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी, तसेच केंसर सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे.
बरीच मुले बिटची कोशिंबीर खात नाही पण त्याचे सूप केले तर त्याचा लालचुटुक येणार रंग पाहून मुल बिट सूप आवडीने पितात.सघ्या पावसाळा असल्याने मी हरयाणा आलं व लसूण आवर्जून घातले आहे . मी आठवड्यातून एकदातरी हे बिट चे सूप करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1बिट
  2. 2गाजर
  3. १टॉमेटो
  4. 1 टेबलस्पूनमीरे पूड
  5. 1 टेबलस्पूनलसूण (बारीक चिरून)
  6. 1 टेबलस्पूनआलं (बारीक चिरून)
  7. 2 टेबलस्पूनसाखर
  8. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  9. 1 टेबलस्पूनबटर
  10. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बिट, गाजर व टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करुन घ्यावे. सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य काढून घ्यावे.

  2. 2

    एका पातेल्यात गाजर बीट व टोमॅटोचे तुकडे घेऊन त्यात दीड वाटी पाणी घालावे. कुकरला तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावे

  3. 3

    गाजर,बीट व टोमॅटो शिजल्यावर कुकर मधून काढून घ्यावे. आता त्यातील पाणी एका भांड्यात वेगळे काढून ठेवा.(हे पाणी आपल्याला नंतर वापरायचे आहे). थोडे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरमध्ये दोन वेळा फिरून त्याची चांगले प्युरी करून घ्या. आताही प्युरी गाळणीने गाळून घ्या म्हणजे टोमॅटोच्या बिया असल्या तर त्या काढून टाका. व छान छान स्मूद पेस्ट घ्या.

  4. 4

    आता आपण बाजूला काढून ठेवलेले पाणी घाला. आता एका भांडे तापले की त्यात एक चमचा बटर घाला त्यावर बारीक चिरलेला लसूण व आले घालून दोन मिनिटे परतून घ्या. आता तयार व गळून केलेली आपली बीट गाजर व टोमॅटोची प्युरी घाला. त्यात मिरपूड, चवीप्रमाणे मीठ व साखर घाला. सूपची कन्सिस्टन्सी चेक करा गरज वाटल्यास थोडेसे पाणी घाला

  5. 5

    सूप चांगले पाच मिनिटे उकळले की गरम गरम बाउल मध्ये काढा व वरून फ्रेश क्रीम ने गार्निश करून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes