काजूतांदूळ  खीर (kaju tandul kheer recipe in marathi)

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#रेसिपीबुक #week8

नारळी पौर्णिमा रेसिपीज पोस्ट 1

नारळी पौर्णिमा म्हंटलं कोकण समोर येतो आणि काजू, भात कोकणात भरपूर पिकतो. साध्य मी कोकणात असल्यामुळे काजूचे आणि तांदळाचे बरेच प्रकार मला खायला मिळाले. तिथलीच एक तांदळाची रेसिपी मी सांगणार आहेत. ती म्हणजे तांदळाची खीर. पण काजू आणि तांदळासोबत त्यात मी आणखी एक पदार्थ घातलाय त्यामुळे खिरीला आणखी छान टेस्ट आली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्राम तांदूळ आंबेमोहोर /इंद्रायणी
  2. 50 ग्राम काजू
  3. 50 ग्राम ओलं खोबऱ्याचा किस
  4. 1/2 लिटरपाणी
  5. 2 टीस्पूनसाजूक तूप
  6. 2 टीस्पूनशेवई
  7. 2 टीस्पूनकाजूबदाम काप
  8. 3ते 4 काड्या केसर
  9. 1/4 टीस्पूनजायफळ पूड
  10. 1/2 टीस्पूनवेलदोडा पूड
  11. 150 ग्राम साखर
  12. 200 मिली दूध

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    तांदूळ आणि काजू एकत्र 15 मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवा. नंतर पानी काडून तांदूळ आणि काजू एकत्र मिक्सर मधे थोडे पाणी घालून बारीक करूनघ्या.

  2. 2

    पातेल्यात तूप टाकून शेवया खरपूस भाजा. त्यातच नंतर काजूबदाम चे काप परतून घ्या. खोबरं हि त्यातच टाकुन थोडेसे परता.

  3. 3

    आता मिक्सर मधील काजूतांदळात थोडं पाणी घालून चमच्याने फिरवत पातेल्यात ओता. तांदळाच्या गाठी होऊ नये म्हणून सतत चमच्याने ढवळत राहा.

  4. 4

    आता त्यात साखर, केसर, जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालून हलवा.

  5. 5

    खिरीचा रंग बदलला कि त्यात दूध घाला. खीर उकळे परियंत सतत चमच्याने ढवळत राहा. 15 मिनिटांनी गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes